लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी तब्बल ९१ अर्ज दाखल झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वी ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे शनिवार अर्ज दाखल करण्यासाठीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात अर्ज दाखल करणाºया इच्छुकांची गर्दी झालेली होती. शेवटचा दिवस म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याचे तहसील कार्यालयांच्या सूत्रांनी सांगितले. आता एक दिवस वाढवून मिळाल्याने इच्छुकांची संख्या वाढणार आहे. जिल्ह्यात ८४ ग्रामपंचायतींच्या १३२ जागांसाठी हा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. शनिवारी दुपारी शेवटचा दिवस म्हणून अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. त्यात अर्जांसाठी एक दिवस वाढवून मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे काही काळ इच्छुक व त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु नंतर अर्ज सादर करण्यास एक दिवस वाढवून मिळाल्याचे कळताच इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. शनिवारी सर्वाधिक ४२ अर्ज साक्री तालुक्यात तर सर्वात कमी ९ अर्ज शिंदखेडा तालुक्यात दाखल झाले. शिरपूर तालुक्यात २५ तर धुळे तालुक्यात १५ अर्ज दाखल झाले. त्या-त्या तालुक्यातील ग्रा.पं.निहाय दाखल अर्जांची संख्या अशी : साक्री तालुका- वासखेडी दोन, भडगाव (व) तीन, नागपूर (व) एक, छडवेल कोर्डे सहा, नवापाडा एक, काळटेक एक, जांभोरे एक, पिंपळगाव बु।।. एक, बसरावळ एक, नांदर्खी दोन, खरगाव एक, छाईल चार, प्रतापपूर दोन, शेणपूर एक, दहीवेल दोन, शिवखट्याळ दोन, वार्सा एक, नवे नगर दोन, पानखेडा एक, पिंंपळनेर दोन, मंदाणे एक, शेलबारी एक व सुकापूर तीन. शिरपूर तालुका - बाभुळदे दोन, गुºहाळपाणी दोन, जळोद दोन, विखरण तीन, वरूळ दोन, कोडीद दोन, जुने भामपूर एक, नवे भामपूर एक, शेमल्या दोन, टेकवाडे दोन, चिलारे दोन, चांदपुरी दोन, गधडदेव एक, कळमसरे एक व अजनाड दोन. शिंदखेडा तालुका - दरखेडा एक, चौगाव एक, महाळपूर एक, रंजाणे एक विरदेल दोन, विखरण एक, चिरणे एक, दभाषी एक.
धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ९१ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:58 AM
एकदिवस वाढवून मिळाल्याने, इच्छुकांची संख्या वाढणार
ठळक मुद्दे ८४ ग्रामपंचायतींच्या १३२ जागांसाठी पोटनिवडणूकएकदिवस वाढवून मिळाल्याने, अर्जांची संख्या वाढणारपोटनिवडणुकही चुरशीची होण्याची चिन्हे