लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) आठ जागांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत १४६ पैकी १४३ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. दिवसभरात ९७.९५ टक्के इतके मतदान झाले. या निवडणुकीसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, गुरुवारी, सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दीड तासात निकाल हाती येण्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. डीपीडीसीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जुने व नवीन नियोजन सभागृह, अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली. सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. तर सायंकाळी साडे चार वाजेपर्यंत ९७.९५ टक्के इतके मतदान झाले. ९ पैकी एक जागा बिनविरोध २०११ च्या लोकसंख्येच्या निकषानुसार वाढीव ८ जागा, तर दोंडाईचा नगरपालिकेची (लहान नागरी मतदार संघ) रिक्त झालेली १ अशा ९ जागांसाठी जिल्हा नियोजन समितीची निवडणूक घेण्यात येणार होती. परंतु, मोठ्या नागरी मतदार संघातून (महापालिका क्षेत्र) अनुसूचित जाती प्रवर्गाच्या राखीव जागेसाठी राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीचे नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांचा एकच अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जिल्हा नियोजन विभागाने जाहीर केले होते. ८० महिलांनी बजावला हक्क डीपीडीसी निवडणुकीत ग्रामीण, लहान नागरी व नगरपंचायत मतदार संघातील १४६ मतदारांपैकी दिवसभरात १४३ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत ६३ पुरुष व ८० महिला पदाधिकाºयांनी मतदान केले. तर ग्रामीण मतदार संघातून २ मतदार व नगरपंचायत मतदार संघातील एक मतदार मतदान करू शकले नाहीत.
डीपीडीसीच्या आठ जागांसाठी ९७ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 6:53 PM
निवडणूक : १५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; जिल्हाधिकारी कार्यालयात आज मतमोजणी; दीड तासात निकाल येणार
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात मतमोजणीला गुरुवारी सकाळी दहा वाजेपासून प्रारंभ होणार आहे. एका टेबलावरच मतमोजणी होणार आहे. ही मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय बोरूडे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी तुकारमतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात होईल. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश बंदी ठेवण्यात येणार आहे. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरच थांबून निकालाची प्रतीक्षबुधवारी निवडणुकीच्या दिवशी दुपारी दीड वाजता वाजता निवडणुकीच्या रिंगणातील काही उमेदवारांनी त्यांच्या बाजूने असलेल्या मतदान फुटू नये, म्हणून मतदारांना थेट ट्रॅव्हल्समधून (जी. जे. १४ एक्स ८८८२) आणल्याचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दुपारी दिसून आले.ह