शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

९४ परप्रांतीय मजूर उत्तरप्रदेशकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 9:48 PM

धुळे जिल्हा : प्रशासनाच्या परवानगीनंतर सर्वांना वेगवेगळ्या बसद्वारे भुसावळपर्यंत पाठविण्यात आले, मजुरांमध्ये समाधान

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर/शिरपूर/दोंडाईचा : धुळे जिल्हयात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांचा आपल्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. बुधवारी सकाळी पिंपळनेर येथील ५६ व शिरपूर तालुक्यातील दहिवद,अर्थे येथील २२ तर दोंडाईचा येथील १६ अशा एकूण ९४ मजूर आज भुसावळमार्गे उत्तरप्रदेशकडे रवाना झाले आहेत.लॉकडाउनमुळे अनेक मजूर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. या मजुराची आतापर्यंत स्थानिक प्रशासनामार्फत भोजन व राहण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र लॉकडाउनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढविल्याने, या मजुरांना आता घरची ओढ लागलेली आहे. त्यातच केंद्र शासनाने परराज्यात जाणाऱ्यांसाठी काही नियम घालून दिले आहेत. त्यामुळे परप्रांतीयांचा आपल्या गावाकडे परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच बिजासनी घाटात अडकलेल्या २० हजार परप्रांतीयांना मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशमध्ये पाठविल्यानंतर स्वगृही जाण्याचा सिलसिला सुरू झाला आहे.पिंपळनेरयेथेही उत्तरप्रदेशचे मजूर कामानिमित्त आले होते. लॉकडाउनमुळे ते या परिसरातच गेल्या दीड महिन्यांपासून अडकून पडलेले होते. आम्हाला देखील घरी जाऊ द्यावे अशी त्यांची प्रशासनाकडे सारखी मागणी सुरू होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले. अप्पर तहसीलदार विनायक थवील यांच्या मदतीने ५६ मजुरांना बुधवारी सकाळी रवाना केले. या सर्व मजूरांना सेयान इंटरनॅशनल स्कूल व डी.जे.अगरवाल पब्लिक स्कूल या बसच्या माध्यमातून भुसावळकडे पाठव्यिात आले. तेथून त्यांना रेल्वेने उत्तरप्रदेशकडे पाठविण्यात आले. या मजुराचा संपूर्ण डाटा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगुर्डे, मंडळ अधिकारी राजपूत, तलाठी दिलीप चव्हाण त्यांनी गोळा करून दिला .त्यानंतर प्रशासनाकडून त्यांना परवानगी देण्यात आली. नायब तहसीलदार ठाकूर यांनी या मजुरांच्या तिकीटांची व्यवस्था केली. घरी परतण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सहकार्यामुळे या सर्वांनी प्रशासनाने आभार व्यक्त केले. दरम्यान या मजुरांना विश्व रूहानी मानवी केंद्रातर्फे भोजनाचे पाकिट देण्यात आले.शिरपूरतालुक्यातील दहीवद व अर्थे येथे अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या २२ मजुरांना दहिवद येथून बसने भुसावळ येथे पाठविण्यात आले. हे मजुरही पुढे रेल्वेने आपल्या गावी जातील. मजुरांना गावी जाण्यासाठी तहसीलदार आबा महाजन यांच्यासह महसूल विभागाने तत्काळ व्यवस्था केल्याने या परप्रांतीय मजुरांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.दोंडाईचायेथे काम करणाºया उत्तर प्रदेशच्या १६ मजुरांना मूळ गावी पाठविण्यात आले .दोडाईचात बांधकाम , दागदागिने दुकाने व इतर क्षेत्रात काम करणारेपरप्रांतीय कामगार आहेत. संचारबंदीत मालकाने हात वरकेल्याने त्यांची उपासमार होत होती. दोंडाईचातील १६ परप्रांतीय मजुरांना आज महसूल प्रशासनाने गाडीवर भुसावल स्टेशनला पोचवून श्रमिक एक्स्प्रेसने उत्तर प्रदेश राज्यात पाठविण्यात आले. तहसीलदार सुदाम महाजन यांनी कोठारी पार्कला जाऊन मजुरांची भेट घेतली.मजुरांची वैद्यकीय तपासणी केली. अहिंसा इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन राजेश मुनोत यांनी प्रवाशी गाडीची व्यवस्था करून दिली .त्या प्रवाशी गाडीने परप्रांतीय मजुरांना भुसावळला पाठविण्यात आले. या समयी अपर तहसीलदार सुदाम महाजन, सर्कल धनगर,तलाठी एस.एस. पाटील, सौरभ मुनोत आदी उपस्थित होते .डॉ अनिकेत मंडाले यांनी मजुरांना मार्गदर्शन केले.गुजरातमध्ये गेलेले मजूर पिंपळनेरकडे परतू लागलेपिंपळनेर - गुजरात राज्यातील सुरतीगिर सोमनाथ या ठिकाणी गुळ कारखान्यात कामासाठी गेलेले पिंपळनेर- ईदगावपाडा येथील २५६ मजुरांची सुटका झाली आहे. आमदार मंजुळा गावित यांनी गुजरात सरकारकडे पत्रव्यवहार केला होता. यातील ५० मजूर पिंपळनेरकडे परतीसाठी निघाले आहेत अशी माहिती आमदार गावित यांनी दिली आहे. पिंपळनेर येथील ईदगावपाडा व साक्री तालुक्यातील गुजरात राज्यातील सुरती गिर सोमनाथ या ठिकाणी ऊसतोड मजूर व गूळ कारखान्यात कामासाठी गेलेले २५६ मजूर कोरोना लॉकडाऊन व संचार बंदीमुळे अडकून पडले होते. संबंधित ठेकेदाराने आमदार मंजुळा गावित यांच्याशीे संपर्क साधून व्यथा व्यक्त केल्या यानंतर गावित यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गुजरात राज्याचे मुख्यमंत्री तसेच पीठासीन अधिकारी राजेंद्र भागवत यांच्याशी संपर्क साधून मजुरांना मूळ गावी आणण्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी केल्यानंतर गावित यांच्या मागणीला यश मिळाल्याने २५६ गूळ कारखान्यात काम करणाºयाा मजुरांची सुरती गिर सोमनाथ येथून प्रशासनाद्वारे सोडण्यात आले आहे,

टॅग्स :Dhuleधुळे