शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

चोरीचे सोने बिनधास्त वापरा,  त्याचे पैसे करून मज्जा करा; हतबल शिक्षकाचं पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2024 5:01 PM

तीन वर्षांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास न लागल्याने सेवानिवृत्त शिक्षकाने लिहिले चक्क चोरांनाच पत्र

भिका पाटील

शिंदखेडा (धुळे) : शहरातील एका कॉलनी परिसरात एका सेवानिवृत्त शिक्षकाकडे चोरट्यांनी हातसफाई करीत सुमारे चार ते पाच लाखांचा ऐवज लंपास केला. तीन वर्षांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास न लागल्याने, पोलिसांनीही ‘फाइल’बंद केली. त्यामुळे उद्दिग्न झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाने चक्क चोरांना पत्र लिहून चोरीचे सोने बिनधास्त वापरा, त्याचे पैसे करून मज्जा मारा, असे पत्र लिहिले आहे. सध्या या पत्राची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.

शहरातील शिंदखेडा प्रोफेसर कॉलनीत राहणारे सेवानिवृत्त प्रा. जी. पी. शास्त्री यांच्याकडे तीन वर्षांपूर्वी चोरी झाली होती. चोरट्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने, साड्या, देव्हाऱ्यात ठेवलेली रोख रक्कम, असा एकूण साडेचार ते पाच लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी त्यांनी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. दरम्यान, तीन वर्षांत चोरीचा तपास लागला नाही. त्यांना शिंदखेडा न्यायालयातून समन्स आला की, आपण न्यायालयात हजर राहा. सेवानिवृत्त शिक्षकाला वाटले आपल्या चोरीचा काहीतरी छडा लागला असेल. मात्र सदर केस पोलिसांनी कोणताही तपास लागत नसल्याने ‘अ’ समरी म्हणून न्यायालयात पाठवली. त्यात त्या शिक्षकाने केस चालवायची नाही म्हणून कोर्टात सांगितले. मात्र चोरीबाबत त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते म्हणून त्यांनी चोरांनाच पत्र लिहिले

असा आहे पत्राचा मजकूरभावांनो, माझ्या घरात तुम्ही चोरी करून आज तीन वर्षे पूर्ण झाली. सुमारे चार ते पाच लाखांचा ऐवज आपण लांबवला. खरं तर आपल्या विरुद्ध पोलिस तक्रार करण्याची इच्छाच नव्हती, पण तक्रार केली. पोलिसांनी तुम्हाला शोध शोध शोधले, पण तुम्ही सापडलेच नाहीत. या चोरीचे टेन्शन आता तुम्ही अजिबात ठेवू नका. तुम्ही लूटलेले चार- पाच लाख रुपयांचे सोने आता तुमचे झाले आहे. बिनधास्त रहा. चोरलेले दागिने बिनधास्त वापरा..त्याचे पैसे करून वापरा..मौज करा..पण, भावांनो खरंच आनंद मिळतो का रे, असे दुसऱ्याच्या घामाचे ..कष्टाचे चोरून ? तुम्ही जर माणूस असाल तर कष्टाचे आणि घामाचे पैसे जातात नं तेव्हा काय मन:स्थिती होते हे एकदा तुमच्या आई आणि वडिलांना वेळ काढून एकदा विचारून पाहा.