धुळे : साक्री तालुक्यातील निजामपूर शिवारातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी तांब्याची, ॲल्युमिनियमची तार चोरून नेल्याची घटना घडली. चोरून नेलेल्या तारांची किंमत १ लाख पाच हजार हजार रुपये एवढी आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७९ हजारांची तांब्याची तार लंपास
शिवाजीनगर, निजामपूर येथील ब्लॅाक नंबर १ मधील युनिट क्रमांक ४ मधून अज्ञात चोरट्यांनी ७९ हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेल्याची घटना १८ नोव्हेंबंर रोजी पहाटे ४:३० ते ५:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी भटू दत्तात्रय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २१ नोव्हेंबर रोजी निजामपूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल आर.यू.मोरे करीत आहेत.
पोल वाकवून तार चोरली
निजामपूर परिसरात असलेल्या नवागाव भागात अज्ञात चोरट्यांनी गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या लघुदाब वाहिनीचे चार पोल वाकवून त्यावरील ४३ हजार १८६ रुपये किमतीची ॲल्युमिनियमची तार चोरून नेली, तसेच पोलचे नुकसान केले. ही घटना २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ ते पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ सागर अर्जुन पेंढारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलिसात २१ रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॅान्स्टेबल आर.यू. मोरे करीत आहेत.