धुळे : कौटुंबिक कारणावरून वाद झाल्याने शिवीगाळ करत महिलेला काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना साक्री तालुक्यातील मोहने पैकी गुंजाळ गावात शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सपिरा युवराज देसाई (वय २७, रा. मोहने पैकी गुंजाळ, ता. साक्री) या महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सपीरा यांची चुलत बहीण माहेरी निघून गेली. तिला समजून सांगितले नाही हा राग मनात धरून वाद घालण्यात आला. वादाचे पडसाद तीव्र उमटल्याने यातून शिवीगाळ करत हाताबुक्याने मारहाण करण्यात आली. एकाने काठीने हल्ला केल्याने यात सपीरा देसाई यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यात जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी परिवारातीलच चौघांविरोधात गुन्ह्याची नोंद शनिवारी दुपारी १ वाजता करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल एम. पी. शिरसाठ घटनेचा तपास करीत आहेत.