शिरपूर (धुळे) : शिरपूर-शहादा मार्गावरील वाघाडी गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने तो सरळ झाडाला ठोकला गेल्यामुळे गंभीर दुखापती झाला होता. अपघाताची ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली हाेती. उपचार घेत असताना एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.
शिरपूर-शहादा मार्गावरील वाघाडी गावाजवळील कर्मवीर पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला होता. दुचाकी गाडी क्रमांक जीजे २२ जे २६८७ ने संतोष राजू पारधी (वय २४) रा. डेडियापाडा ता. जि. नर्मदा (गुजरात) व त्याचा मावसभाऊ रविंद्र पीतांबर पारधी (वय ३२) रा. मोराणे प्र. नेर. ता. साक्री हे दोघे जण शिरपूरकडून वाघाडी गावाकडे डबलसीट जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार रवींद्र पारधी भरधाव वेगाने जात असताना त्याचे नियंत्रण सुटले, अन् सरळ समोरील झाडावर जाऊन दुचाकी आदळली. दुचाकीसह दोघेही फेकले गेल्याने त्यात ते गंभीर दुखापती झालेत. उपचार घेत असताना रवींद्र पारधीचा याचा मृत्यू झाला. याबाबत शिरपूर पोलिसात संतोष पारधी याने दिलेल्या खबरीवरून मयताविरोधात प्राणांकित अपघात नोंदविण्यात आला. पुढील तपास पो.हे.कॉ. प्रेमसिंग गिरासे हे करीत आहेत.