लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : येथील आषाढी उत्सवाच्या भागवत सप्ताहाच्या सहाव्या दिवशी श्रीकृष्ण रुख्मिणी स्वयंवर सोहळा आणि कृष्ण सुदाम्याचे चरित्र वर्णन या विषयावर ह भ प शरदचंद्र पुराणिक महाराजांचे निरूपण गोडी लावणारे ठरले़ अनेक वर्षांच्या परंपरेनुसार यंदाही आषाढ शुद्ध द्वितीयेपासून येथे श्री विठ्ठल मंदिरात आषाढी उत्सव सोहळा सुरू आहे़ शरदचंद्र पुराणिक महाराजांनी भागवत निरूपण केले. या वेळी मंदिरात स्वयंवर सोहळ्यात श्रीकृष्ण,रुख्मिणी रूपातील बालके सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होते़ पुराणिक महाराजांनी कृष्ण सुदाम्याची मैत्री भौमासूर वध, आणि कृष्णाचा परम बालसखा सुदामा च्या चरित्रावर रसाळ भाषेत कथा निरूपण करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. आषाढ उत्सवाच्या निमित्ताने मंदिरात विविघ कार्यक्रम सूरू आहेत़
आषाढी उत्सव भागवत कथेत रूख्मिणी स्वयंवर सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 10:50 AM