शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

साक्रीनजिक विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, बाप-लेकीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 4:22 PM

सुरत-नागपूर महामार्ग : दिवाळीच्या सुट्या लागल्याने घरी येताना घडली घटना

ठळक मुद्देसाक्री तालुक्यातील छडवेल पखरुणजवळील दुर्घटनावडिलांसह मुलीचा दुर्देवी अंत तर अन्य विद्यार्थी व पालक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : सुरत नागपुर महामार्गावर छडवेल पखरूण गावाजवळ दुपारी दीड वाजेच्या सुमारास शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात होऊन एका विद्यार्थिनीसह वाहनाचा चालकाचा जागीच मृत्यू झाला़ या घटनेनंतर मदतकार्य वेगाने सुरु झाले़ घटनेबद्दल हळहळ व्यक्त झाली़ या अपघातात चालक संदीप गावित व त्यांची मुलगी दिपाली गावित हे दोनच जण मरण पावले आहेत़ बाकी जखमी आहेत़ सर्व विद्यार्थी मालेगाव तालुक्यातील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमधील आहेत़ साक्री तालुक्यातील आदिवासी भागात राहणारे हे विद्यार्थी होते़ या अपघातात दिपाली संदिप गावित (१३, रा़ पिंजारझाडी)  आणि संदीप ब्रिजलाल गावित (चालक) हे जागीच मरण पावले आहेत़ या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़तर इतर जखमींवर साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ अपघातातील गंभीर जखमींमध्ये दिलबर एकनाथ चौरे (वय १०, रा़ पाचमौली) हिरालाल ब्रह्मा चौरे (रा़ पाचमौली) राजेंद्र भगवान पवार (वय ३५, रा़ मावचीपाडा) यांचा समावेश आहे तर इतर जखमींमध्ये करीना मनोहर कांबळे (वय १३ रा़ रायतेल) दीक्षांत भरत गावित (वय १०, रा़ पिंजारझाडी) मृणाल कन्हैयालाल भोये, भारती भीमराव बागुल (वय १३, रा़ गुलतारे) कन्हैयालाल तुळशीराम भोये (वय ३०, रा़ जामखेल), भरत आत्माराम गावित (वय ५०, रा़ पिंजारझाडी) या सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ़ भरत गोहील व डॉ़ भदाणे व ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाºयांनी जखमींवर उपचार केले आहेत़यासोबत साक्री शहरातील तरुणांनी रुग्णालयात येऊन जखमींची मदत केली़ हे सर्व विद्यार्थी आदिवासी विकास विभागामार्फत मालेगाव तालुक्यातील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल येथे त्यांचे अ‍ॅडमिशन झाले होत़े  हे सर्व विद्यार्थी दिपावळीच्या सुट्या लागल्याने आपल्या घरी जात होते़ यावेळेस या विद्यार्थ्यांच्या सोबत काही पालकही होते़ पालकांनी गावातीलच एमएच १८ डब्ल्यू ६६५३ क्रमांकाचे वाहन भाडे तत्वावर करुन विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शाळेवर गेले होते़ तेथून परत येत असताना छडवेल पखरून जवळ समोरून येणाºया वाहनाने गाडीला हुलकावणी दिल्याने विद्यार्थ्यांचे वाहन पलटी झाले़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात