सदानंद नाईक, उल्हासनगर : भारत-आफ्रिका क्रिकेट सामन्यावर एका अँपद्वारे क्रिकेट खेळणाऱ्या ६ बुकीला धुळे जिल्हा क्राईम विभागाने सोमवारी सायंकाळी अटक केली. याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून शहर क्रिकेट मॅच सट्टा सट्टा सट्टाचे माहेरघर झाल्याची टीका होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात राहणारे बिसम वाधवानी, साजन कुकरेजा, धीरज वलेच्छा, अनिल वाधवानी, रवी धामेजा व हितेश खिलनानी हे सहा जण भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट मॅचवर एका अँपद्वारे क्रिकेट सट्टा खेळत असल्याची माहिती धुळे जिल्हा ग्रामीण क्राईम विभागाला माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी धुळे येथे भांदवी ३५९(२३), ४२०, ३४ व जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पर्यंत ६ जणांना अटक करून याबाबतची नोंदणी स्थानिक विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी ६ जणांना धुळे क्राईम ब्रँचने अटक केली असून याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात झाल्याची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी मध्यवर्ती पोलिसांनी रात्री उशिरा पर्यंत सुरू राहणाऱ्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकून ३ डान्सबारवर छापा मारून ५० बारबालासह ७८ ग्राहकांना अटक केली होती.
शहर क्रिकेट सट्टाचे केंद्र बनल्याची टीका सर्वस्तरातून होत असून पुन्हा एकदा सिद्ध झाले. यापूर्वीही क्रिकेट सट्टा प्रकरणी अनेकांना अटक झाली. यामध्ये कोट्यवधींचा उलाढाल होत असून मोठ्या माशे कारवाई पासून दूर असल्याचे बोलाविले जात आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रिकेट सट्टा सुरू असल्याची माहिती कशी नाही? असा प्रश्न स्थानिक पोलीस प्रशासनावर झाला आहे.