ऑनलाईन लोकमत / राम निकुंभ धुळे, दि. 10 - राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत दारूबंदीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून दोन महिन्यात अपघातांची संख्या जैसे थे असून त्यात मृत्यूमुखी पडणा:या किंवा जखमींच्या संख्येत मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. दारूबंदी लागू केल्यानंतरचे दोन महिने आणि त्याआधीच्या दोन महिन्यांतील अपघातांची तुलना करता ही बाब स्पष्ट झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत 1 एप्रिलपासून दारूबंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वेगात, निष्काळजीपणे वाहने चालविणे, अवघड वळणे या कारणाबरोबरच वाहनचालकांकडून मद्यसेवन करून वाहने चालविण्यामुळे अपघात होत असतात. महामार्गावर सहज मद्य उपलब्ध होत असल्याने हे अपघात होत असल्याचे मानले जात होते.त्यामुळे महामार्गावरील परमीट रूम, दारू दुकानांमधून सहज मद्य उपलब्ध होऊ नये, म्हणून महामार्गापासून पाचशे मीटरच्या अंतरावरील दारू विक्री बंद झाली आहे. त्यात जिल्ह्यातील महामार्गावरील 260 दारू दुकाने बंद झाली आहेत. त्यात 40 देशी दारू दुकाने, 13 वाईप शॉप, 146 परवाना कक्ष, 61 बिअर शॉपी अशा एकूण 260 दारू दुकानांचा समावेश आह़े जिल्ह्यात महामार्गाचे जाळे आहे. सुरत-नागपूर, मुंबई-आग्रा, धुळे-सोलापूर, अंकलेश्वर-बु:हाणपूर असे महामार्ग जिल्ह्यातून जातात. या मार्गावरील अपघातात वर्षाला 350हून अधिक जणांचा मृत्यू होतो. या महामार्गावरच सर्वाधिक दारू दुकाने होती. महामार्गावरील दारूबंदीनंतर एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अपघातांची माहिती घेतली असता, अपघातांच्या संख्येमध्ये घट होण्याऐवजी वाढ झाल्याचे आढळून आले.एप्रिल महिन्यांत प्राणघातक 22 अपघात झाले असून त्यात 25 जणांना जीव गमवावा लागला, 14 गंभीर अपघात होऊन 54 जण गंभीर जखमी झाल़े मे महिन्यात 19 अपघातात 28 जणांचा मृत्यू, तर 21 गंभीर अपघातात 54 जण गंभीर जखमी झाले. दोन्ही महिन्यात 26 किरकोळ अपघातात 74 जखमी झाले आहे.महामार्गावरील दारूबंदी लागू होण्यापूर्वी मार्च महिन्यात 17 प्राणघातक अपघात होऊन 20 जण ठार, तर 8 गंभीर अपघातात 28 गंभीर जखमी झाले होते. तसेच फेब्रुवारी महिन्यात 13 अपघातात 14 ठार, तर 14 गंभीर अपघातात 28 गंभीर जखमी झाले होत़बेकादेशीर दारूविक्री रोखण्याची गरज महामार्गावर दारूबंदी असली, तरी हॉटेल्स व धाब्यांवर सहज दारू उपलब्ध होत आहे. पोलिसांनी केलेल्या हॉटेलमधील छाप्यांवरूनही ही बाबसमोर येत आहे. बेकायदेशीर दारू विक्री रोखल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते. अपेक्षा फोल कारण नेमके काय?फेब्रुवारी-मार्च आणि एप्रिल-मे महिन्यांच्या या तुलनेनुसार प्राणघातक अपघातांची संख्या या कालावधीत सारखीच 30 एवढी असली तरी मृतांच्या संख्येत मात्र दारूबंदीनंतर 34 वरून 53 अशी दीडपट वाढ झाली आहे. गंभीर अपघातांची संख्या 22 वरून 35 अशी वाढली असून जखमींच्या प्रमाणातही 56 वरून 108 अशी जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. किरकोळ अपघात मात्र दारूबंदीनंतर 31 ऐवजी 26 असे घटले आहेत. याऊलट जखमींच्या संख्येत मात्र पुन्हा 60 वरून 74 अशी सव्वा पट वाढ दिसून आली आहे. ही आकडेवारी पाहता दारूबंदीनंतर राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत अपघातांची संख्या घटेल व प्राणहानी कमी होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे मात्र एप्रिल व मे महिन्यात असलेल्या सुटय़ा व लगAसराईच्या हंगामामुळेसुद्धा वाहतुकीत वाढ होऊन अपघातांची संख्या वाढल्याचे कारण देण्यात येत आहे.
दारूबंदीनंतरही धुळे जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत वाढ
By admin | Published: June 10, 2017 1:31 PM