धुळे : महापालिका कर्मचारी समन्वय समितीचे उपाध्यक्ष प्रसाद जाधव यांच्या निलंबनाचे आदेश आयुक्त संगीता धायगुडे यांनी मंगळवारी रात्री पारित केले होत़े सदरचे आदेश मागे होईर्पयत शुक्रवारपासून बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कर्मचारी समन्वय समितीने गुरुवारी सायंकाळी जाहीर केल़े तर दुसरीकडे आयुक्तांनी सोमवार व मंगळवारी झालेल्या काम बंद आंदोलनात सहभागी 277 कर्मचा:यांचे दोन दिवसांचे वेतन कपात करण्याचे आदेश गुरुवारी काढल़े त्यामुळे प्रशासन व कर्मचारी संघटना आमनेसामने आली आह़ेप्रशासन-संघटनेत वितुष्टमहापालिका कर्मचारी समन्वय समिती व प्रशासनात गेल्या काही दिवसांपासून वितुष्ट निर्माण झाले आह़े परिणामी विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेने सोमवारी काम बंद आंदोलन सुरू केले होत़े सदर आंदोलनात सहभागी कर्मचा:यांचे वेतन कपात करण्याचा इशारा देणारी नोटीस प्रशासनाने संघटनेला बजावली असताना आंदोलन सुरू होत़े अखेर मंगळवारी सायंकाळी काम बंद आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर आयुक्तांनी त्याच दिवशी रात्री कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रसाद जाधव यांच्या निलंबनाचे आदेश पारित केल़े सदर निलंबनाच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेने गुरुवारी सायंकाळी मनपा आवारात बैठक बोलावली होती़ संघटना संपविण्याचा डावमहापालिका कर्मचारी समन्वय समितीच्या बैठकीत भूमिका मांडताना अध्यक्ष सुनील देवरे व सचिव भानुदास बगदे यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला़ आयुक्तांकडून कर्मचा:यांना हीन दर्जाची वागणूक दिली जात आह़े प्रसाद जाधव यांच्या निलंबनाची कारणे न पटणारी असून द्वेषभावनेने ही कारवाई करण्यात आली़ कर्मचारी संघटनेच्या पदाधिका:यांचे कारवाईद्वारे मानसिक खच्चीकरण करून संघटना संपविण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचे ते म्हणाल़े तसेच जाधव यांना 23 जानेवारीच्या आंदोलनासाठी दोषी धरण्यात आले असले तरी आयुक्तांनी 30 हजार रुपये फरकापोटी मंजूर केलेले असताना ते रद्द का केले याचा जाब कर्मचारी जाधव यांना विचारत होते. त्या वेळी आपण प्रशासनाकडे खुलासा केल्यानंतर हे प्रकरण संपुष्टात आले होते, असेही संघटनेचे पदाधिकारी म्हणाल़े प्रशासनाचा ‘इगो’ दुखावतो!प्रसाद जाधव हे कर्मचा:यांचे प्रश्न अग्रक्रमाने मांडत असल्याने प्रशासनाला कर्मचा:यांना न्याय द्यावा लागतो व प्रशासनाचा ‘इगो’ दुखावला जातो म्हणून जाधव यांच्यावर कारवाई झाल्याचे निवेदनात नमूद आह़े आजपासून बेमुदत धरणेजाधव यांचे निलंबन विनाअट जोर्पयत मागे घेतले जात नाही तोर्पयत सर्व कर्मचारी काम बंद करून मनपा आवारात धरणे आंदोलन व उपोषण करतील व त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आल़े कास्ट्राईब संघटनेचा पाठिंबामनपा कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या आंदोलनास कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी़एम़ आखाडे यांनी पाठिंबा जाहीर केला आह़े संघटनेच्या बैठकीत आखाडे यांनी तशी घोषणा केली़महापालिका प्रशासनाने गुरुवारी दोन वेगवेगळे आदेश पारित केल़े त्यातील एका आदेशानुसार कायम कर्मचा:यांना आस्थापना विभागाकडून नोटिसा देण्यात येत आहेत़ त्यानुसार, फंडातील कर्मचा:यांना पाचव्या वेतन आयोगापोटी 30 हजार रुपये देणे व रोजंदारी कर्मचा:यांना नवीन रोजंदारी दरवाढ लागू करणे या मागण्यांसाठी कर्मचारी समन्वय समितीने 13 व 14 फेब्रुवारीला काम बंद आंदोलन केल़े वरील मागण्यांशी संबंध नसताना व कायम कर्मचा:यांच्या मागण्या आधीच मान्य झालेल्या असताना काम बंद आंदोलनात सहभागी होऊन आपण प्रशासनाला वेठीस धरल्याने दोन दिवसात खुलासा आस्थापना विभागाकडे सादर करावा़ समाधानकारक खुलासा न केल्यास मनपा अधिनियम 1949 चे कलम 56 (2) नुसार कारवाई केली जाईल, अशा नोटिसा कायम कर्मचा:यांना देण्यात येत आहेत़ 277कर्मचा:यांचे दोन दिवसांचे वेतन कपात़़़4मनपा प्रशासनाने दुसरा आदेश काढत कायम, फंड व रोजंदारी कर्मचा:यांना नोटीस बजावून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झालेले असतांना काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याने दोन दिवसांचे वेतन कपात करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आह़े काम बंद आंदोलनाची व्हिडिओ शूटिंग तपासून एकूण 277 कर्मचा:यांचे वेतन कपात करण्यात येणार आह़े तर संघटनेची शासनाकडे नोंद नसल्याबाबतही प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आह़े
प्रशासन-कर्मचारी संघटना आमनेसामने!
By admin | Published: February 17, 2017 1:12 AM