धुळे : शहरातील पांझरा नदीकिनारी २००८ मध्ये उभारण्यात आलेल्या चौपाटीवरील २६ स्टॉलधारकांना शनिवारी जिल्हा प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत़ ९ मार्चपर्यंत चौपाटीवरील स्टॉल्स काढून घ्यावेत, अन्यथा १० तारखेला पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाईल, असे नोटिसीत नमूद आहे़शहरातील पांझरा चौपाटीची निर्मिती २००८ मध्ये आमदार अनिल गोटे यांनी केली होती़ मात्र, सदरची चौपाटी बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करीत पत्रकार योगेंद्र जुनागडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती़ तर शिवसेना नगरसेवक नरेंद्र परदेशी यांचादेखील पाठपुरावा सुरू होता़ दरम्यान, चौपाटीवर कारवाईला मुख्यमंत्र्यांनी दिलेला स्थगनादेश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी रद्द केला होता व चौपाटी ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते़ त्यानुसार न्यायालयात दाखल याचिकेत जिल्हाधिकाºयांनी प्रतिज्ञापत्र देऊन कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते़ त्यानुसार अखेर शनिवारी पांझरा चौपाटीवरील स्टॉलधारकांना नोटिसा देण्यात आल्या़, तसेच याठिकाणी काही स्टॉल्स बंद स्थितीत असल्याने संबंधित स्टॉल्सला नोटिसा चिकटवण्यात येऊन पंचनामा करण्यात आल्याचे अपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ जिल्हा प्रशासनातर्फे कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त घेण्यात आला आहे़
चौपाटीवरील २६ स्टॉल्सधारकांना प्रशासनाने बजावल्या नोटिसा!
By admin | Published: March 04, 2017 11:36 PM