धुळे : महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये औषधे संपली असल्याची ओरड वारंवार झाल्यानंतर चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबवून औषध खरेदीचे काम मार्गी लावण्यात आल़े मात्र या प्रक्रियेला प्रशासकीय मंजुरी नसल्याचा आक्षेप लेखा विभागाने घेतल्याने दीड महिन्यापासून रखडलेल्या औषध खरेदीचा मार्ग अखेर बुधवारी मोकळा झाला़ मनपाचे 10 अॅलोपॅथी दवाखाने, 2 सूतिकागृह, एका कुटुंब कल्याण केंद्रासाठी 2016-17 या वर्षासाठी लागणा:या औषध खरेदीसाठी तीन वेळा निविदा मागविण्यात येऊनही प्रतिसाद न लाभल्याने चौथ्यांदा निविदा प्रक्रिया पार पडली होती़ त्यानुसार प्राप्त निविदा दरांना 8 डिसेंबरला स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली़ स्थायी समितीने शासकीय दरापेक्षा कमी दराने 83 प्रकारची औषधे खरेदीची निविदा मंजूर केली आह़े या औषधींसाठी 55 लाख 5 हजार 935 रुपयांचा खर्च अपेक्षित आह़े दरम्यान, स्थायी समितीच्या सभेत औषधांचा विषय मंजूर झाल्यानंतर तो लेखा विभागाकडे गेला असता मुख्य लेखापरीक्षकांनी औषध खरेदीस प्रशासकीय मंजुरी नसल्याचा आक्षेप घेतला होता़ त्यामुळे प्रशासकीय मंजुरीसाठी औषध खरेदीची फाईल उपायुक्त व सहायक आयुक्तांकडे गेली़ मात्र स्वच्छ सव्रेक्षण अंमलबजावणी, केंद्रीय व राज्य समितीचा दौरा, नाशिक पदवीधर निवडणुकीची जबाबदारी यामुळे संबंधित अधिकारी व्यस्त असल्याने औषध खरेदीची फाईल पडून होती़ आरोग्य विभागाने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर औषध खरेदीला तब्बल दीड महिन्यानंतर प्रशासकीय मंजुरी मिळाली असून त्याबाबतची कार्यालयीन टिपणी आयुक्तांना सादर केली जाणार आह़े त्यानंतर औषधे मागविली जातील़ मनपा दवाखान्यांमध्ये तीन ते चार महिन्यांपासून औषधे संपली असल्याने तात्पुरती औषधे मागवून आरोग्य विभागाला काम पाहावे लागत होत़े
औषध खरेदीला प्रशासकीय मंजुरी!
By admin | Published: January 26, 2017 2:05 AM