आॅनलाइन लोकमतधुळे : आर.टी.ई.अंतर्गत वंचीत व दुर्बल घटकांतील बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. त्यानुसार २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी तिसरी सोडत आॅनलाईन लॉटरी पद्धतीने १३ जून रोजी काढण्यात आली. त्यात ३५२ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड करण्यात आली.आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाकरिता १० फेब्रुवारीपासून आॅनलाईन नोंदणी सुरू झालेली होती. १२ मार्च अखेरपर्यंत ९३ शाळांमधील १ हजार १८१ जागांसाठी एकूण १ हजार ४६५ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या दोन सोडतीमध्ये ८७३ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यापैकी ६४९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. १५ मे १८ रोजीच्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज ३१ मे ते १२ जून अखेर पुन्हा मागविण्यात आले होते. त्यानुसार तिसरी सोडत १३ रोजी जिल्हा परिषदेत काढण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले उपस्थित होते. तिसºया सोडतीत ३५२ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी अलॉट झालेल्या शाळेत २४ जून पर्यंत प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पालकांना एसएमएस मिळणार नाहीत...पहिल्या दोन सोडतीत विद्यार्थ्याची निवड झाली की नाही यासंदर्भातील एसएमएस पालकांच्या मोबाईलवर पाठविण्यात येत होता. मात्र आता तांत्रिक अडचणींमुळे पालकांना एसएमएस येणार नाहीत. त्यामुळे पालकांनी आरटीईच्या वेबसाईटवर जाऊन पाल्याची निवड झाली की नाही याची स्वत:खात्री करावी असे शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
आरटीई प्रवेशासाठी धुळे जिल्हयात तिसºया सोडतीत ३५२ विद्यार्थ्यांची लॉटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:05 AM
दोन सोडतीअखेर ८७३ पैकी ६४९ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश
ठळक मुद्देमोफत प्रवेशासाठी १४६५ अर्ज प्राप्त९३ शाळांमधील १ हजार १८१ जागादोन फेºयांअखेर ६४९ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश