धुळे : मनपा आरोग्य अधिकारी पदासाठी डॉ़ मोरे यांची नियुक्ती करावी यासाठी उपमहापौर अंपळकर यांनी राजीनाम्याची शस्त्र उपसले होते़ प्रशासनाने तत्काळ भरतीला थांबवावी अशी मागणी देखील त्यांनी निवेदनाव्दारे केली होती़ प्रशासनाने मात्र ठाम भुमिका घेत अखेर एप्रिल फुलचा धक्का देत डॉ़ पवार यांच्याकडे मनपा आरोग्य अधिकारीपदाची सुत्रे सोपविण्यात आली़असा घडला होता प्रकारमहापालिका आरोग्य विभागात १९९८ पासून तब्बल १२ वर्ष आरोग्य अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने या पदाचा पदभार डॉ़ बी़बी़ माळी यांच्याकडे सोपविण्यात आला होता़ ३१ मार्चला डॉ़ माळी सेवानिवृत्त होत असल्याने रिक्तपद भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ या भरतीसाठी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीवरून प्रशासनावर भष्ट्राचाराचे आरोप करण्यात आले होते़ त्यामुळे पहिल्यांदाच भाजपातील दोन्ही गटातील वाद चव्हाट्यावर आले होते़नियुक्तीवर प्रशासन ठामभरती प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा आरोप व भरती प्रकियेत उपमहापौर अंपळकर यांना सहभागी करून न घेतल्याने नाराज झालेल्या महापौर अंपळकर यांनी राजिनामा देण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र मंत्री डॉ़ सुभाष भामरे यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्यात आला़ मात्र अंपळकरांसह महिला पदाधिकाºयांकडून भरती प्रक्रिया रद्द करून चौकशी करावी अशी मागणी आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली होेती़ मात्र लोकप्रतिनिधीचा विरोध पत्करून डॉ़ पवार यांची नियुक्ती करण्यात आली़विरोधापुर्वीच नियुक्ती८ मार्चला आरोग्य अधिकारी पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या़ डॉ़ मधुकर पवार यांची पात्रता व कामाचा अनुभवानुसार नियुक्तीचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता़ त्यामुळे भरती प्रक्रिया रद्द करण्यापुर्वीच डॉ़ पवार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजते़सोमवारी पहिली बैठकडॉ़ पवार यांनी सोमवारी पदभार स्विकारल्यानंतर दुपारी आरोग्य विभागात स्वच्छता आरोग्य, मलेरिया यांच्यासह विविध विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली होती़ यावेळी स्वच्छता व नव्या घंटागाड्या प्रभागनिहाय नियोजनावर चर्चा करण्यात आली होती़नियुक्तीबाबत उपमहापौर अंधारातउपमहापौर अपंळकर यांनी आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेची चौकशी करून रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती़ त्यानंतर आचार संहिता लागु झाल्यानंतर या भरतीप्रक्रिेयाला स्थगिती मिळाल्याची चर्चा होती़ मात्र आचार संहितेपुर्वीच डॉ़पवार यांची आरोग्य अधिकारी पदासाठी नियुक्तीचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आल्याची चर्चा आहे़ दरम्यान डॉ़पवार यांच्या नियुक्तीबाबत उपमहापौर अंपळकर अनभिज्ञ होते़ मात्र अचानक सोमवारी १ एप्रिलला डॉ़मधुकर पवार यांच्याकडे मनपा आरोग्य अधिकारी पदाचे सुत्रे सोपविण्यात आली़ दरम्यान या नियुक्तीबाबत उपमहापौर कल्याणी अंपळकरांना अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू होती़कामाचा प्रदीर्घ अनुभवडॉ़मधुकर पवार यांनी (सार्वजनिक आरोग्य तज्ञ) म्हणुन धुळे व नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणुन १० वर्ष सेवा, विभागीय आरोग्य व कुंटूंब कल्याण व प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणुन ३ वर्ष सेवा, आरोग्य सेवा संचालयात सहाय्यक संचालक म्हणुन ३ वर्ष व राज्याच्या क्षयरोग व कुष्ठरोग विभागात उपसंचालकानंतर १ एप्रिलपासुन आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे़
अखेर डॉ़पवारांकडे मनपा आरोग्यधिकारी पदाची सुत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:21 PM