राजेंद्र शर्मा। लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्या गटात गेल्या दोन महिन्यांपासून रंगत चाललेला सामना रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे अर्निणीत राहणार असल्याचे चित्र आहे. आणि सोमवारी रात्री मुंबईत पक्षश्रेष्ठी आणि आमदार गोटे यांच्यातील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे जर सर्वकाही तसेच घडले. तर एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका करणारे भाजपचे हे नेते पुन्हा एक व्यासपीठावर येणार का, तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या लोकांचे भवितव्य आता काय राहणार, त्यांना जर भाजपने तिकिट नाकारले तर ते बंडखोरी करणार का, त्यांचे भवितव्य काय असणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. धुळे महानगरपालिका निवडणुकीत सध्या शहरात भाजपामधील दोन समांतर गटांचे प्रचार कार्यालय कार्यरत आहेत. एका प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार अनिल गोटे यांनी केले तर दुसºया कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. दोन्ही प्रचार कार्यालयात १९ प्रभागातील ७४ जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखतीसुद्धा झाल्या आहेत. महापालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसभेतील गोंधळ नंतर दुसºया दिवशी आमदार गोटे यांनी महापौर पदासाठी जाहीर केलेली आपली उमेदवारी अणि आमदार पदाचा राजीनामा देण्याची घोषणा, त्यानंतर गेल्या आठवडयात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यात पत्रकार परिषदेतून रंगलेला कलगीतुरा या घटना ताज्या आहेत. त्यातच रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की, आमदार अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार नसून ते महापालिका निवडणुकीत पक्षाचा प्रचार करतील. या घोषणेनंतर महापालिका निवडणुकीचे राजकीय गणितच बदलले आहे. कारण आमदार अनिल गोटे यांच्याकडे जर महापालिका निवडणुकीची धुरा गेली तर मग प्रचारासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, भाजपचे महापालिका निवडणूक प्रभारी गिरीश महाजन, रोहयो मंत्री जयकुमार रावल हे एका व्यासपीठावर येतील का, असा सवाल निर्माण होत आहे. कारण डॉ.भामरे आणि गोटे या दोन्ही गटांकडून एकमेकांवर झालेल्या आरोप- प्रत्यारोपानंतर ते कसे शक्य होणार, हाही एक प्रश्नच आहे. कारण ज्यांच्या सभाच एकमेकांवर आरोप करण्यामुळे गाजत होत्या. त्यांना आता बोलण्यासाठी कोणता विषय राहिल. काय सांगतील एकमेकांबद्दल, ते लोकांना कुठपर्यंत रुचेल. पक्षातील कार्यकर्त्यांनाही ते मान्य होईल का, हे सर्वप्रश्न आजतरी अनुत्तरीत आहे. पण म्हणतात ना की, राजकारणात काहीही अशक्य नसते, त्यामुळे हे सर्व पुन्हा एका व्यासपीठावर येणेही अशक्य नाही. पण याचा परिणाम महापालिका निवडणुकीत पॉझीटीव्ह होतो की निगेटीव्ह ते महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. एवढे मात्र, निश्चित आहे की, बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर निश्चितच दिसून येणार आहे.
मनोमिलनाच्या घोषणेनंतरही प्रश्न अनुत्तरीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:01 PM
डॉ.सुभाष भामरे व अनिल गोटे एका व्यासपीठावर दिसणार का : राष्टÑवादीतून भाजपमध्ये आलेल्यांचे भवितव्य काय?
ठळक मुद्देराष्ट्रवादीतून आलेल्याचे काय ? जे निवडून येऊ शकतात, अशा राष्टÑवादीतून भाजपमध्ये प्रवेश दिलेल्या उमेदवारांचे भवितव्य काय राहणार. कारण आमदार गोटे त्यांच्यातील अनेकांच्या प्रवेशावर नाराज होते. ते त्यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांचे भाजपमधील भवितव्य काप्रभारी गिरीश महाजनांची भूमिका आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट म्हटले आहे की, महापालिका त्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. मग पक्षाचे प्रभारी गिरीश महाजन यांची भूमिका काय राहणार, हाही एक प्रश्नच आहे.७०-३० चा फॉर्म्युला वापरणार का आमदार अनिल गोटे आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यात जर दिलजमाई झाली तर मग सुरुवातीला चर्चेत असणाºया ७०-३० या फॉर्म्युल्याप्रमाणे जागा वाटप होणार, की नवीन कोणता फॉर्मुला वापरला जाणार, याबाबत चर्चा सुरु झा