ठळक मुद्दे - सार्वजनिक बांधकाम विभागाकडून साक्रीरोडचे रूंदीकरण सुरू- अतिक्रमण हटविल्यानंतर तातडीने रस्त्याचे काम - ३ कोटी रूपयांतून होणार २८ मीटर रूंदीचा रस्ता
लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील साक्रीरोडवरील अतिक्रमण बुधवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आल्यानंतर आता रस्त्याच्या रूंदीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे़ विद्यावर्धिनी महाविद्यालयापासून रस्त्याचे सपाटीकरण सुरू झाले आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३ कोटी रूपयांच्या खर्चातून साक्रीरोडचे रूंदीकरण केले जाणार आहे़ रूंदीकरणानंतर हा रस्ता तब्बल २८ मीटर रूंद होणार आहे़ रस्त्याच्या रूंदीकरणासह दुभाजक, गटारी, एलईडी पथदिवे, फुटपाथ, वृक्ष लागवड केली जाणार आहे़ बुधवारी अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याचे काम हाती घेतले आहे़ जुना टोलनाका ते मोतीनाल्यापर्यंत रस्त्याचे काम होणार आहे़