लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या धरणे आंदोलनाचा रविवारी ३० व्या दिवशी समारोप झाला़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करत घोषणाबाजी करून आंदोलनाचा समारोप करण्यात आला़ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने २१ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते़ या आंदोलनादरम्यान प्रतिकात्मक अंत्ययात्रा, दशक्रिया विधी व मुंडण, रास्तारोको, रेलरोको, स्वच्छता मोहिम, कुटूंब मेळावा, धुळे बंद, जागरण गोंधळ, अर्धनग्न, थाळीनाद, घंटानाद या मार्गांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला़ मात्र सरकारकडून अजूनही आरक्षणाबाबत ठोस निर्णय झालेला नाही़ त्यामुळे १० सप्टेंबरनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे जाहीर करत रविवारी धरणे आंदोलनाचा समारोप करण्यात आला़ यावेळी क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज मोरे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले़ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे पूजन करून आंदोलनाच्या ३० व्या दिवशी समारोपाची घोषणा करण्यात आली़ यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़
धुळ्यात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 6:21 PM
जिल्हाधिकारी कार्यालय : ३० दिवस पूर्ण, आंदोलनाची पुढील दिशा सप्टेंबरमध्ये
ठळक मुद्देतब्बल ३० दिवसानंतर झाला आंदोलनाचा समारोपपदाधिकाºयांसह कार्यकर्ते उपस्थित