साक्री तालुक्यातील मालनगाव ग्रामपंचायतीने यापूर्वी निर्मल ग्राम पुरस्कार पटकावला असून संपूर्ण स्वच्छता अभियानात जिल्हा परिषदेचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. गावालगतच्या नाल्यावर लोकसहभागातून वनराई पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले. यामुळे पाणी जमिनीत मुरल्याने त्याचा फायदा शेतीला होत आहे. कार्यक्षेत्रात वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन व्हावे म्हणून त्यांना संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या. ग्रामस्थांना विरंगुळ्यासाठी चौकाचौकात सीमेंटचे बाक, अमरधामात बांधकाम, शाळेत डिजिटल वर्ग, हॅन्ड वॉश स्टेशन आदी सुविधा केल्या. मालनगाव धरणाजवळील औषधोपयोगी वनस्पती रोप वाटिकेतर्फे लागवडीसाठी रोपे दिली जातात. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी ग्रा.पं.तर्फे नेहमी प्रयत्न केले जातात.
मालनगाव ग्रा़प़चे संरपंच साहेबराव चौधरींंना कृषी तंत्रज्ञान पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 4:15 PM