लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ संचलित एन.एम.आय.एम.एस. अभिमत विद्यापीठ मार्फत २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी स्कूल आॅफ अॅग्रिकल्चर सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीचे (कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान) नवीन दालन मुकेशभाई पटेल टेक्नॉलॉजी पार्क येथे सुरु झाले आहे. लवकरच शिरपूर-चोपडा मार्गावरील तरडी-बभळाज गावाजवळ सुमारे ११५ एकर जागेवर कृषि विद्यापीठ व महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.एस.व्ही.के.एम. च्या एन.एम.आय.एम.एस. मार्फत स्कूल आॅफ अॅग्रिकल्चर सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी येथून बी.एस्सी. अॅग्रिकल्चर ही पदवी युजीसी मान्यताप्राप्त असेल. १२ वी किंवा समकक्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बी.एस्सी. अॅग्रिकल्चर हा ४ वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. परदेशात जावून उच्च शिक्षण घेण्यासाठी हा अभ्यासक्रम वैध आहे. इस्त्राईल व कॅनडा या देशांशी करार करण्यात येवून जागतिकस्तरावरील अभ्यासक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या कल्पकतेतून शिरपूर-चोपडा महामार्गावर तरडी-बभळाज गावाजवळ निमार्णाधीन ११५ एकर जागेवरील कृषि विद्यापीठ व महाविद्यालयाचे कॅम्पस हे शेतकरी बांधव व त्यांच्या मुलामुलींसाठी मोठे अभ्यासकेंद्र बनणार आहे या कॅम्पसमध्ये शेतीसाठी आवश्यक बी, बियाणे, खते, माती परीक्षण यांसह अनेक बाबी तपासणीच्या अद्ययावत प्रयोगशाळा देखील उभारण्यात येणार आहेत.एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष, एन.एम.आय.एम.एस. अभिमत विद्यापीठाचे कुलपती तथा माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्यासह उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, ट्रस्टी तपनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, शिरपूर कॅम्पस संचालक डॉ.आर.एस. गौड, स्कूल आॅफ अॅग्रिकल्चर सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ.गौरी शंकर राव, शिरपूर कॅम्पसचे मुख्य लेखापाल व प्रशासक राहुल दंदे यांचे या नूतन शैक्षणिक दालनाला देशातील नामांकित कृषि शाखेचा दर्जा प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे.
तरडीजवळ ११५ एकर जागेवर कृषी विद्यापीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 12:24 PM