ऑनलाईन लोकमत
धुळे,दि. - राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून निर्माण होणारे नवीन विद्यापीठ धुळ्यात व्हावे, या घोषणेसाठी धुळेकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आह़े राज्य शासनाने घेतलेल्या शेतकरी कजर्माफी व सातव्या वेतन आयोगाच्या निर्णयामुळे चालू वर्षात विद्यापीठ विभाजनासाठी निधी उपलब्ध होणे दुरापास्त असल्याची माहिती कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निमंत्रक तथा माजी आमदार प्रा़ शरद पाटील यांनी दिली़
धुळ्यातील कृषी महाविद्यालयात सर्व सुविधा व विद्यापीठासाठी आवश्यक आराखडा तयार असल्याने नियोजित कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे, या मागणीसाठी माजी आमदार प्रा़शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी विद्यापीठ निर्माण कृती समिती स्थापन करण्यात आली आह़े या समितीकडून जवळपास दीड वर्षापासून कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी पाठपुरावा केला जात आह़े शहराच्या सीमेला लागून व विस्तारित शहराच्या मध्यभागी कृषी महाविद्यालयाची 750 एकर जमीन असून, तालुका पिंप्री फार्मची 100 एकर आणि शासकीय शेतकी शाळेची 100 एकर जमीन महाविद्यालयाच्या परिसरात उपलब्ध आह़े विद्यापीठ स्थापनेसाठी लागणारे सर्व विभाग, प्रयोगशाळा, वसतिगृह, क्रीडांगण, विकसित झालेली हॉर्टिकल्चर नर्सरी आज उपलब्ध आह़े नवीन कृषी विद्यापीठाला हॉर्टिकल्चर नर्सरी निर्माण करण्यासाठी 15 वर्षाचा कालावधी लागेल. धुळे विभाग कोरडवाहू असल्याने पिकांवरील संशोधन व हवामान बदलानुसार पीक पद्धती संशोधनासाठी धुळ्यात आदर्शवत आहे. त्यामुळे धुळ्यात कृषी विद्यापीठ उभारले गेल्यास संशोधनास मोठी चालना मिळू शकत़े त्यामुळे कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीने सतत पाठपुरावा केला आह़े