शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

एअर डोम काढून दुकानात हातसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 10:35 PM

एकावर संशय : १ लाख १२ हजार लंपास

धुळे : दुकानाच्या छताला लावण्यात आलेले एअर व्हेंटीलेशन अर्थात डोम काढून दुकानात प्रवेश करुन गल्ल्यात ठेवलेले १ लाख १२ हजाराची रोकड लांबविल्याची घटना धुळ्यातील गल्ली नंबर ४ मध्ये घडली़ याप्रकरणी जुने धुळ्यातील एका संशयिताविरुध्द गुन्हा दाखल झाला़ अभय कॉलेज परिसरातील शिव कॉलनी शांतीनगर भागात राहणारे सागर कैलास पाटणी यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, पाटणी यांचे गल्ली क्रमांक ४ मध्ये बँक आॅफ   महाराष्ट्र समोर नवरत्न नावाचे जनरल स्टोअर्स आहे़ या दुकानाच्या छताच्या पत्र्याला एअर व्हेंटीलेशन अर्थात डोम बसविण्यात आलेला आहे़ नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन पाटणी आपल्या घरी निघून गेले़ सकाळी दुकान उघडल्यानंतर नेहमीप्रमाणे कामकाजाला सुरुवात झाली़ गल्ल्यात ठेवलेले पैसे त्यांना आढळून आले नाही़ शोधाशोध केल्यानंतर आपल्या दुकानात चोरी झाल्याचा अंदाज त्यांना आला़ त्यांनी दुकानाच्या वरच्या बाजुला पाहिल्यानंतर दुकानाच्या छताला लावलेला डोम बाजुला सरकलेला त्यांना दिसला़ हा डोम बाजुला करुन चोरटा दुकानात शिरला आणि त्याने गल्ल्यात ठेवलेले १ लाख १२ हजाराची रक्कम अगदी सहजपणे चोरुन नेल्याचे प्राथमिक तपासणीतून समोर आले़ चोरीची ही घटना गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे़ याप्रकरणी शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास सागर पाटणी यांनी आझादनगर पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली़ त्यानुसार चोरट्याविरुध्द ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक एम़ एऩ सहारे घटनेचा तपास करीत आहेत़ संशयित शहरातलानवरत्न जनरल स्टोअर्स या दुकानात कामावर असणारा जुने धुळे परिसरात राहणारा श्रीराम कैलास मिटकर याला कामावरुन पाटणी यांनी काढून टाकले होते़ त्यामुळे त्याने ही चोरी केली असावी असा संशय पाटणी यांना आहे़ याच संशयावरुन श्रीराम मिटकर विरुध्द गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी