शिरपूर : तालुक्यातील तांडे येथील मुकेशभाई आर.पटेल सैनिकी शाळेचा माजी विद्यार्थी ईश्वर बोरसे याची आर्मीतील लेफ्टनंट पदाकरीता निवड करण्यात आली आहे. त्याचासह परिवाराचा सत्कार संस्थेचे सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केला़तांडे येथील सैनिकी शाळेचा माजी विद्यार्थी ईश्वर बोरसे यांची आर्मीतील लेफ्टनंट पदावर निवड झाल्यानंतर तो शाळेतील शिक्षकांना भेटण्यासाठी आला होता़ बोरसेने यू.पी.एस.सी मार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस परीक्षेत प्राविण्य प्राप्त केले असून त्याची एस.एस.बी़ मुलाखतीद्वारे आर्मीतील लेफ्टनंट पदासाठी निवड करण्यात आलीत़त्याने विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रात अधिकारी होण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. अधिकारी होण्यासाठी लागणारी प्रबळ इच्छाशक्ती दृढ संकल्प तसेच सातत्य या विशेष गुणांवर प्रकाश टाकला. परीक्षेचे स्वरूप आणि मुलाखतीमध्ये भावी अधिकाऱ्यांमध्ये पाहिल्या जाणाºया अपेक्षित गोष्टी यांच्यावर चर्चा केली. अधिकारी हा सर्वच क्षेत्रात निपून असावा म्हणजेच संपूर्ण व्यक्तिमत्त्व असावा असा मौल्यवान सल्ला दिला. त्यानेत्याच्या यशाबद्दल एस.व्ही.के.एम़ संस्थेचे अध्यक्ष अमरीशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, ट्रस्टी तपनभाई पटेल, वस्तीगृह समिती चेअरमन यशवंत बाविस्कर, प्राचार्य दिनेश राणा यांनी कौतुक केले.
सैनिकी शाळेतील माजी विद्यार्थी लेफ्टनंट पदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:42 PM