धुळे : लघुउद्योग हा देशाचा कणा आहे़ कोणताही व्यवसाय किंवा उद्योग हा कधी नुकसान करणारा नसतो़ मात्र व्यवसाय किंवा उद्योग करतांना नेहमी सकारात्क विचार डोळ्यासमोर ठेवल्यास निश्चित यश प्राप्त होते, असे प्रतिपादन लघुउद्योग भारतीचे राष्ट्रीय महामंत्री गोविंदराव लेले यांनी केले़ शहरातील मालेगाव रोडवरील दाते सभागृहात सोमवारी लघुउद्योग भारतीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय अधिवेशन घेण्यात आले आहे़ यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक अनिल भालेराव, प्रदेशाध्यक्ष रविंद वैद्य, संचालक सुनिल रायथत्ता, सीए़ जी़बी़ मोदी आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले़ यावेळी लेले यांनी लघु उद्योग भारती संघटनेचा इतिहास, कार्य व भविष्यातील योजना या विषयी माहिती देऊन नागपुर येथील अधिवेशनात जिल्ह्यातील उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले़ यावेळी राजेंद्र भतवाल, राजेश वाणी, प्रकाश बागुल, देवेंद्र राजपूत, संजय बागुल, सुभाष कांकरिया, राजेंद्र जाखडी, प्रशांत मोराणकर, नितीन बंग, यांचा सत्कार करण्यात आला़प्रास्ताविक सुभाष कांकरिया यांनी तर सुत्रसंचालन जाखडी यांनी केले़ तर आभार राहूल कुलकर्णी यांनी केले़ अधिवेशनात लखन भतवाल, रवी बेलपाठक, साहेबचंद जैन, संजय चौधरी, राजेश पाटील, कैलास अग्रवाल, मनोज अग्रवाल, आकेश अग्रवाल, अजय चांडक, निमित कटभरा, राजेश गिंंदोडीया, सीए़ राजाराम कुलकर्णी, संजय बागुल आदी उपस्थित होते़ यशस्वीतेसाठी वर्धमान संघवी, बापु बडगुजर, अविनाश पाटील, पराग शाह, अतुल शाह, हाकीम मलक, पवन अग्रवाल, मयुर मुथा आदींनी प्रयत्न केले़
उद्योग करतांना नेहमी सकारात्मक विचार असावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:36 PM