शिरपूर,दि.11- प्राथमिक शाळेतील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना शासनाकडून दोन जोडी गणवेशाची रक्कम देण्यात येत़े यापूर्वी, ही रक्कम शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येत होती, परंतु आता ही रक्कम सरळ विद्याथ्र्याचे नवीन खाते आईसोबत संयुक्त पध्दतीने काढले जाणार असून त्या खात्यावर ही रक्कम टाकली जाणार आह़े
स्थानिक स्वराज्य संस्थेत विद्याथ्र्याची उपस्थिती वाढावी, त्यांना शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी व श्रीमंत गरीब असा भेदभाव नष्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्याथ्र्याना गणवेश देण्याची योजना शासनाने सुरू केली आह़े शाळेत सर्व विद्यार्थी गणवेशात यावे यासाठी शासनाने वर्षातून दोन गणवेश विद्याथ्र्याना देण्याची सोय केली़ वर्ग 1 ते 8 च्या सर्व विद्यार्थीनी, अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व द्रारिद्रय रेषेखालील विद्याथ्र्याना दोन गणवेश देण्यात येत़े या विद्याथ्र्याना दोन गणवेश देण्यासाठी त्या गणवेशाची रक्कम त्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येत होती़ मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष मिळून त्या गणवेशाची खरेदी करायच़े एका गणवेशासाठी 200 रूपये असे दाने गणवेशासाठी 400 रूपये एका विद्याथ्र्याच्या मागे शाळेला मिळत होत़े परंतु या गणवेशातही मोठय़ा प्रमाणात भ्रष्ट्राचार होत असल्याच्या बातम्या झळकत असल्याने ही बाब शासनाच्या लक्षात आली़
आता ही रक्कम सर्व शिक्षा अभियानाकडून शाळा समितीलाच देण्यात येणार आहे, परंतु विद्यार्थी व त्याची आई यांचे संयुक्त खाते शुन्य रूपयात उघडलेल्या खात्यावर टाकायची आह़े यामुळे आता गणवेशाच्या पैशात घोळ होणार नाही़ या नव्या धोरणानुसार पालकांनी दोन गणवेश घेतल्याची पावती संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांना दिल्यानंतर सदर रक्कम खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल़े
शिरपूर तालुक्यात 1 ते 8 च्या वर्गासाठी जिल्हा परिषदेच्या 264 व नगरपालिकेचे 10 असे एकूण 274 शाळा आहेत़ त्यात एकूण सर्व मुली 13 हजार 262, एससी मुले 619, एसटी मुले 9 हजार 499 व बीपीएल मुले 1 हजार 608 असे एकूण 24 हजार 988 लाभाथ्र्याना गणवेश दिले जाणार आह़े तालुक्यात या शाळेतील एकूण विद्यार्थी पटसंख्या 26 हजार 446 आह़े त्यामुळे उर्वरीत 1 हजार 459 विद्यार्थी हे खुले प्रवर्ग व एनटी जमातीचे असल्यामुळे अशांना गणवेश देता येत नाही़
त्यामुळे जवळपास 25 हजार लाभार्थी विद्याथ्र्याना प्रत्येकी दोन जोडी गणवेश सन 2017-2018 या आर्थिक वर्षासाठी दिले जाणार आहेत़ शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी गणवेशातच जाणार आहेत़