मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प तब्बल १३ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर पूर्ण क्षमतेने भरला असून ओव्हर फ्लॉ झाल्याने गुरुवारी रात्री आठ वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.
मालपूर येथील अमरावती व नाई नदीवरील अमरावती मध्यम प्रकल्पा असून गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसा मुळे तसेच गेल्या दोन महिन्यात झालेल्या पावसा मुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.रात्री ८ वाजेला दोन दरवाजे ०.२५ मीटरने व रात्री १२ वाजेच्या सुमारास ०.३० मीटर ने उघडण्यात आले या अनुषंगाने एकूण १४८३ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग अमरावती नदीपात्रात सोडण्यात आला आहे.तसेच पावसाचा जोर अधिक वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शक्यता असल्याचे प्रकल्प स्थळी लक्ष ठेऊन असलेले पाटबंधारे विभागाचे अभियंता जे.एम.शेख व प्रशांत खैरनार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.