लोकमत न्यूज नेटवर्कवडजाई : तालुक्यातील वडजाई येथील जि.प शाळेच्या पंटागणात असणारी अंगणवाडी शाळेचा ओटा व पायरीवर दररोज सायंकाळी मद्यपींची शाळा भरत असते. पायरीवर दररोज दारूच्या खाली बाटल्या, प्लास्टीक ग्लास, गावठी दारूच्या पोतलीी पडलेल्या असतात. सकाळी अंगणवाडी उघडण्याअगोदर हे वरील सर्व वस्तु फेकुनच अंगणवाडी उघडावी लागते. तरी या मद्यपींचा त्वरित बंदोबस्त मोहाडी पोलिसांनी करावा, अशी मागणी अंगणवाडी सेविका संगिता सूर्यवंशी व मदतनीस सुमन कोळी यांनी केली आहे.वडजाई येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ अंगणवाडी शाळा आहे. या अगंणवाडीच्या लहानशा ओट्यावर व पायरीवर दररोज सांयकाळी मद्यपी येऊन, मद्य प्राशन करीत असता. सर्व मद्दपी े सायंकाळी सात ते आठ वाजेदरम्यान अगंणवाडीजवळ जमतात. शेजारीच गावठी दारू अड्डे आहेत. तर गावात सर्रास दारूची विक्री सुरू आहे. त्यामुळे दारू घ्यायची व अंगणवाडीच्या पायऱ्यावर बसून दारु प्यायची. काही तरुण महागडी दारू आणतात. सोबत प्लॅस्टिक ग्लास, पाणी पाऊच घेतले की अंगणवाडी समोरील पायºया व पटांगण दारू पिण्यासाठी सोयीचे झाले आहे. या पटागंणात ग्रामपंचायत कार्यालय आहे. अंगणवाडी आहे. जि.प.शाळा आहे. परंतु हा शैक्षणिक परिसर मद्यपींचा अड्डा झाला आहे. याबाबत अगंणवाडी सेविका संगिता सुर्यवंशी व मदतनीस सुमन कोळी यांना विचारले असता त्या म्हणाले की, सकाळी अंगणवाडी उघडण्यासाठी गेलो की अगोदर दारूच्या खाली बाटल्या, पाण्याचे ग्लास, गावठी दारूचे पाऊच हे ओटयावर पायरीवर पडलेले असतात. अगोदर ते आवरावे लागतात मगच अगंणवाडी उघडावी लागते. हे नित्याचेच झाल्याने संताप येतो. सोबत लहान मुले असतात, त्याचा लहान विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होतो. तरी अशा मद्यपींवर कठोर कार्यवाही केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.याबाबत जि.प.शाळेच्या पटांगणात दारूचा अड्डा याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यावेळी मोहाडी पोलिसांनी कार्यवाही केली होती. त्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे.गावात सर्रास विविध प्रकारच्या दारू विक्री केली जाते. परंतु विक्रेत्यांवर कठोर कार्यवाही होताना दिसत नाही. दारू पिणाऱ्यांवर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यत यांचा बदोबस्त होणे शक्य नाही.मोहाडी पोलिसांनी सायंकाळी अचानक भेट देवून मद्दपींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.
अंगणवाडीचा ओटा झाला मद्दपींचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 12:16 PM