धुळे : गेल्या पंधरवड्यात मोती नाला आणि हागºया नाल्याला आलेल्या पुरामुळे चितोड गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने ८० पेक्षा अधिक कुटूंबे विस्थापित झाली आहेत़ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही कुटूंबे स्थलांतरित झाली आहेत़नैसर्गिक आपत्तीमुळे विस्थापित होवून पाच दिवस लोटले तरी या कुटूंबांपर्यंत प्रशासकीय मदत पोहोचलेली नाही़ ग्रामपंचायतीने देखील कोणतीही व्यवस्था केली नसल्याचे सांगण्यात आले़ कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद असल्याने शाळेतील खोल्यांमध्ये या कुटूंबांनी आपला तात्पुरता निवारा उभारला आहे़ परंतु आपत्कालीन परिस्थिती असतानाही प्रशासनाने कोणतीही मदत न केल्यामुळे बाधित कुटूंबातील महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या़मदत आणि पूनर्वसन करण्यासाठी आमच्याकडे पुराव्यांची मागणी केली जात आहे़ परंतु आमचा संपूर्ण संसार, कागदपत्रे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने आम्ही पुरावे कुठून देणार, असा प्रश्न विस्थापितांनी उपस्थित केला आहे़पूरग्रस्त कुटूंबातील महिलांनी सोमवारी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले़ जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर प्रांत अधिकारी भिमराज दराडे यांनी सोमवारी सायंकाळी नुकसानीचा पंचनामा करुन पाहणी केली़ परंतु चोवीस तास झाले तरी शासकीय मदत पोहोचलेली नाही़ चितोड गावातील विस्थापित कुटूंबांना प्रशासनाने वाºयावर सोडल्याचे चित्र आहे़
पूरग्रस्त विस्थापितांना वाऱ्यावर सोडल्याने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 9:51 PM