ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.12 - ‘देशात 8 नोव्हेंबरला नोटाबंदी झाली, डिसेंबरमध्ये अधिवेशनाच्या काळात तुम्ही आलात तर नवीन करंसी आणा, तुमचा माङया डोक्याला ताप नको’, असा त्या ‘क्लीप’मधील वाक्याचा अर्थ असल्याचा खुलासा आमदार अनिल गोटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला़ तसेच मी 1995 पासून मोपलवारांच्या मागावर आहे. त्यांनी 15 वर्षात केलेल्या 800 कोटींच्या अपहारामुळेच त्यांची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली. क्लीपमधील आवाज आपलाच असून हवी ती चौकशी लावा, असे आव्हानही आमदार गोटे यांनी विरोधकांना दिल़े
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आमदार अनिल गोटे व भिसे नामक भाजप कार्यकत्र्याच्या संभाषणाची क्लीप उघड केली होती़ त्यावर खुलासा करण्यासाठी आमदार गोटे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली़ ते म्हणाले की, मोपलवारांच्या संदर्भात आपल्याला विधीमंडळात लक्षवेधी मांडायची होती, परंतु अध्यक्षांनी परवानगी नाकारली़ त्यामुळे औचित्याचा मुद्दा मांडून 46 हजार कोटींच्या समृध्दी महामार्गाची जबाबदारी सोपविण्यात आलेले मोपलवार हे भ्रष्ट आहे, असे विधीमंडळात मांडल़े केवळ मोपलवार हेच नव्हे तर अन्य सात आयएएस अधिकारी देखील त्यात समाविष्ट असून त्यांची नावेही विधीमंडळात घेतल्याचे आमदार गोटे म्हणाल़े त्यामुळे समृध्दी महामार्गातून मोपलवारांची मुख्यमंत्र्यांनी उचलबांगडी केली़ हे फोन टॅपिंगचे उद्योग मोपलवारांचेच असल्याचा आरोपही आमदार गोटेंनी केला़ मोपलवार स्टॅम्प सुप्रिटेंडंट असतांना त्यांनी तेलगीचे बोगस स्टॅम्प अधिकृत असल्याचे दर्शवून त्याची विक्री केली, त्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचकडे गुन्हा दाखल आह़े परंतु विलासराव देशमुखांनी त्यांना वाचविले होत़े मोपलवार हे आघाडी शासनाचे लाडके ‘प्रॉडक्ट’ असल्याची टिका आमदार गोटेंनी केली़
मोपलवारांनी 15 वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व प्रशासकीय प्रमुख डॉ़ जितेंद्र प्रसाद, ईडी, सीबीआय, अँटी करप्शन ब्युरो, इन्कम टॅक्स या सर्व विभागांना दिले आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू असल्याचे आमदार गोटे म्हणाल़े याबाबत पंतप्रधान कार्यालयाचे डॉ़ जितेंद्र प्रसाद यांनी 22-23 तारखेला आपल्याला बोलावले असल्याचेही आमदार गोटे यांनी सांगितल़े सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांना, मोपलवार हे भारतीय प्रशासकीय सेवेला डाग असल्याचे आपण सांगितले आहे, अशी स्पष्टोक्ती आमदार गोटेंनी केली़ मोपलवारांची सर्व पापं आघाडी सरकारच्या काळातील असून त्यांच्या गैरव्यवहारांची माहिती विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सर्व तपास यंत्रणांना दिल्याचे गोटेंनी स्पष्ट केल़े
गुड्डया खुन प्रकरणात राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अडकत चालल्याने लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी क्लीपचा मुद्दा समोर केल्याचा आरोप आमदार गोटेंनी केला़ क्लीपमधील आवाज आपलाच असून हवी ती चौकशी लावा, असे आव्हानही आमदार गोटे यांनी विरोधकांना दिल़े
माङयाकडे मोपलवारांच्या 35 ‘क्लीप’- गोटे
पत्रकार परिषदेत मोपलवार व मांगले यांच्या संभाषणाची ‘क्लीप’ आमदार गोटे यांनी ऐकवली़ मोपलवारांच्या आपल्याकडे 35 क्लीप आहेत, असे गोटेंनी स्पष्ट केल़े स्थानिक नेत्यांना मिळालेली क्लीप आधीच सोशल मिडीयावर व्हायरल झाली असून ती त्यांना सहा महिन्यानंतर मिळाल्याचेही आमदार गोटे म्हणाल़े