धुळे : जिल्ह्यात दारूबंदी करावी, तसेच दारूबंदीचा ठराव झालेल्या गावात संपूर्ण दारूबंदीचे आदेश देऊन आदिवासी महिला सरपंचावर जातीवाचक शिवीगाळ करण्याप्रकरणी दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दारूबंदी आंदोलन समितीतर्फे निदर्शने करण्यात आली.राज्यातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातही दारूबंदी करावी. आजवर जिल्ह्यात अनेक गावांनी दारूबंदीसाठी अनेक वेळा ठराव केलेले आहे. नुसते ठराव करून न थांबता, त्यांनी त्यासाठी अनेक स्तरावर प्रय}सुद्धा केलेत. परंतु आजवर एकही गावात दारूबंदी झालेली नाही. याचे उदाहरण द्यायचे झाले तर आपण चार महिन्यांपूर्वी मौजे निकुंभे या गावातील दोन परवाना असलेल्या दुकानांसह अवैध दारूबंदीचे आदेश दिले. परंतु आपण दिलेल्या आदेशाला सोनगीर पोलिसांनी केराची टोपली दाखवली. गावातील दारूबंदी समितीच्या कार्यकत्र्यानी अनेक वेळा दारू मालासह दारूविक्रेत्याला पकडून दिलेले असताना त्यावर कारवाई करण्याऐवजी समितीच्याच लोकांवर लक्ष न देण्यासाठी दबाव आणला जातो. त्यांना हस्तकामार्फत खोटय़ा केसेस टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात. तर दोन पोलीस कर्मचा:यांनी गावातील आदिवासी महिला सरपंचांना जातीवाचक शिवीगाळ केली. या दोघी पोलीस कर्मचा:यांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी समितीने जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.निवेदन समितीचे निमंत्रक नलव बी ठाकरे, मनीषा ठाकरे, आविष्कार मोरे, सिद्धार्थ जाधव, कृष्णाजी ठाकरे, मोतीलाल भिल, नेमाजी सैंदल, शानाभाऊ पाटील, अमरदीप पवार यांनी दिले. समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणेही दिले.आतार्पयत साक्री तालुक्यातील कासारे, दिगावे, बेहेड, इंदवे, हट्टी खुर्द, सातारपाडा, छडवेल पखरून, प्रतापपूर, कावठे, घोडदे, वरधाने, खोरी, खुडाणे, उमरांडी, बोदगाव तसेच शिंदखेडा तालुक्यातील पढावद, देगाव, वर्शी, लामकानी, धुळे तालुक्यात फागणे, धाडरा, दोंदवाड, कुसुंबा, उडाणे, गोताणे, चौगाव, कापडणे, शिरपूर तालुक्यातील अनेक गावांनी दारूबंदीसाठी अनेकवेळा ठराव व प्रय} केले आहेत. परंतु आजही गावात प्रचंड प्रमाणात सर्रासपणे दारूविक्री सुरू आहे. या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन जिल्ह्यातून दारू हद्दपार करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.
जिल्ह्यात दारूबंदी जाहीर करा!
By admin | Published: April 04, 2017 12:57 AM