शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
2
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
3
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
4
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
5
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
6
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
11
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
16
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
17
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
18
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
19
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
20
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही

धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या सुट्यांचे नियोजन जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 12:20 PM

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये मिळणार ७६ सुट्या

ठळक मुद्देसुट्यांच्या नियोजनासाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकशिक्षक संघटनांचे प्रतिनिधी हजरवर्षभरातील सुट्यांचे झाले नियोजन

आॅनलाइन लोकमतधुळे : सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांना शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये दिल्या जाणाऱ्या सुट्यांचे नियोजन शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार या शैक्षणिक वर्षात शाळांना एकूण ७६ दिवस सुट्या मिळणार आहे. तर यावर्षी प्रथम सत्र १७ जून १९ पासून सुरू होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आलेले आहे.शाळांचे कामकाज वर्षभरात किमान २२१ दिवस झाले पाहिजे. सुट्यांचे नियोजन करण्या संदर्भात शिक्षण संचालकांचे आदेश होते. त्यानुसार हे नियोजन करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच चारही तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी, सोबतच जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीला जवळपास ३७ जणांची उपस्थिती होती. बैठकीत शैक्षणिक वर्ष २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील सुट्यांचे नियोजन करण्यात आले आहे.यात पहिले सत्र १७ जून २०१९ पासून सुरू होणार असून ते १९ आॅक्टोबर १९ पर्यंत राहील. यात दिवाळीची सुटी २१ आॅक्टोबर ते ९ नोव्हेबर १९ अशी १५ दिवसांची राहणार आहे.द्वितीय सत्राला ११ नोव्हेबरपासून सुरूवात होईल. ते ३० एप्रिल २०२० पर्यंत राहील. त्यानंतर १ मे २० रोजी उन्हाळी सुटी सुरू होईल. २०२० मध्ये उन्हाळी सुटी ३४ दिवसांची असेल. या शैक्षणिक वर्षात सार्वजनिक व प्रासंगिक सुट्यांची संख्या २५एवढी असून, मुख्याध्यापकाधिक , स्थानिक सुट्या दोन असतील. अशा एकूण ७६ दिवस शाळांना सुटी राहणार आहे. पुढील वर्षी १५ जून २०२० मध्ये शाळा सुरू होणार आहे.दरम्यान शिक्षण संचालकांचे पत्र आल्यानंतरच प्राथमिक विभागाचे सुट्यांचे नियोजन जाहीर करण्यात येत असते. खान्देशात धुळे जिल्हा परिषदेनेच सर्वात अगोदर सुट्यांचे नियोजन जाहीर केले, अशी माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे