लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मंगळवारी रात्री आणखी ५७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिवसभरात एकूण १६६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.मंगळवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ८४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील ३८, साक्री तालुक्यातील २७, शिरपूर तालुक्यातील १३ व शिंदखेडा तालुक्यातील चार रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ५ हजार ९५२ इतकी झाली आहे.
आणखी ५७ अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:49 PM