शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

धुळे शहरातील सलग दुसरी योजनाही मजिप्राकडे वर्ग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:35 AM

धुळे महापालिकेतील १३६ कोटींच्या पाणी योजनेनंतर १३१ कोटींची भुयारी गटार योजना वर्ग करण्याच्या हालचाली

ठळक मुद्देप्रशासकीय मान्यतेच्या आदेशात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या देय शुल्काचा उल्लेख नाही याचा अर्थ सदर शुल्क महापालिकेने त्यांच्या निधीतून द्यावा असा असल्यास त्यासाठी मनपाची संमती ठरावाच्या स्वरूपात आवश्यक राहणार आहे़ त्यामुळे सदर योजना पूर्ण ठेव तत्वावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करावयाची झाल्यास महापालिकेची पूर्ण संमती अर्थात ठराव होणे आवश्यक आहे़ महापालिका प्रशासन व पदाधिकारी, नगरसेवक यांची भुमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे़

निखिल कुलकर्णी / आॅनलाईन लोकमतधुळे,दि.२० : शहराला अमृत योजनेंतर्गत भुयारी गटार अर्थात मलनि:सारण प्रकल्पासाठी १३१़५४ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र सदर योजना आता ‘पूर्ण ठेव’ तत्वावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्याच्या हालचाली मजीप्रा, मनपा व शासनाच्या नगरविकास विभागात सुरू असल्याचे समोर येत आहे़ तसे झाल्यास १३६ कोटींच्या पाणी योजनेनंतर सलग दुसरी योजना मजीप्राकडे वर्ग होऊ शकते़योजना वर्ग करण्याच्या हालचालीधुळे शहरासाठी मलनि:सारण योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०१७ अन्वये १३१़५४ कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी दिल आहे़ त्यानुषंगाने महापालिकेने सदर कामाचे प्रारूप निविदा प्रपत्रे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सल्ल्याने तयार करून निविदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत़ मात्र सदर निविदांची मुदत पूर्ण होण्यात आली असतांनाच आता अचानक भुयारी गटार योजना पूर्णपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्याच्या हालचाली विशेषत: शासनाचा नगरविकास विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या स्तरावर सुरू झाल्या आहेत़ सद्यस्थितीत महापालिकेमार्फत ई-निविदा प्रगतीत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प सल्लागार समितीची भुमिका बजावत आहे़मनपाकडे मनुष्यबळाचा अभावधुळे महापालिकेकडे तांत्रिक मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे हा प्रकल्प विहीत वेळेत पूर्ण होण्याची शाश्वती नाही, असे नगरविकास विभागाचे म्हणणे आहे़ त्याचप्रमाणे अमृत योजनेच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची भुमिका प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची असून त्यासाठी प्रकल्प किंमतीच्या ३ टक्के एवढी रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास देय होणार आहे़ मात्र पूर्ण ठेव तत्वावर मजीप्रामार्फत योजनेचे काम करावयाचे झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शासन निर्णयानुसार  ७़५ टक्क्यांपेक्षा अधिक शुल्काची आकारणी केली जाऊ शकते़ याशिवाय सदर योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरीत झाल्यास नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यास विलंब देखील होऊ शकतो़ त्यामुळे याबाबत शासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांच लक्ष असणार आहे़ विशेष म्हणजे अशा प्रकारच्या हालचाली सुरू असल्याच्या वृत्तास मजीप्राकडूनही दुजोरा मिळाला़सलग दुसरी योजना वर्ग?महापालिकेने हाती घेतलेली १३६ कोटींची पाणी योजना २०१५ मध्ये तत्कालिन आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांच्या मागणीनंतर शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग केली होती़ सदर योजनेचे काम सध्या सुरू असतांनाच आता दुसरी योजनाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ सदर योजना मजीप्राकडे वर्ग करण्याच्या हालचाली अचानक सुरू होण्यामागे राजकीय हस्तक्षेपाची शक्यता नाकारता येणार नाही़

निविदा रद्द होण्याची शक्यता

सदर कामाची निविदा धुळे मनपातर्फे प्रसिध्द करण्यात आली असल्याने निविदेमध्ये धुळे महापालिका आयुक्तांच्या नावाचा ठिकठिकाणी उल्लेख आहे़ त्यामुळे यापुढे सदर योजना पूर्ण ठेव तत्वावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबवायची झाल्यास भविष्यात कायदेशिर प्रश्न निर्माण होऊ शकतात़ त्यामुळे धुळे महापालिकेकडून सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेली ई-निविदा रद्द करून निविदा प्रपत्रांमध्ये धुळे महापालिकेऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा उल्लेख केला जाण्याची शक्यता आहे़

टॅग्स :Maharahtra Jivan Pradhikaranमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणMuncipal Corporationनगर पालिका