आॅनलाइन लोकमतधुळे : बदलीसाठी खोटी माहिती सादर करणाºया ४५ शिक्षकांना शिक्षण विभागाने नोटीस बजावली होती. मुदत संपल्याच्या दिवसापर्यंत जवळपास १५ शिक्षकांनी नोटिसीला उत्तर दिले आहे. अजुनही ३० शिक्षकांचे उत्तर येण्याची प्रतीक्षा कायम आहे.जिल्हा परिषदेच्या १०५३ शिक्षकांच्या गेल्या महिन्यात आॅनलाइन बदल्या झाल्या. त्यात ४५ शिक्षकांनी संवर्ग १ व २ मध्ये खोटी माहिती भरून बदलीचा लाभ पदरात पाडून घेतला होता. शिक्षक संघटनेच्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली होती. त्यानंतर खोटी माहिती भरणाºया ४५ प्राथमिक शिक्षकांना शिक्षण विभागाने नोटीस बजावून त्याचे पाच दिवसात उत्तर देण्याचे सांगितले होते. नोटिसला उत्तर देण्याची अंतिम मुदत १९ जून होती. या दिवसापर्यंत ४५ पैकी १५ शिक्षकांनी उत्तर दिल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी सांगितले. उर्वरित शिक्षकांचेही खुलासे लवकरच मिळतील असेही ते म्हणाले. प्राप्त झालेले सर्व शिक्षकांचे खुलासे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांच्यासमोर ठेवले जातील. काहींचे म्हणणे ग्राह्य धरण्यात येऊ शकते. त्यानंतर ग्रामविकास विभागाच्या सूचनेनंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे देसले यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यातील १५ प्राथमिक शिक्षकांनी दिले नोटिसीला उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:44 AM
बदली प्रकरण, अजुनही ३० शिक्षकांच्या उत्तराची प्रतिक्षा
ठळक मुद्देबदलीसाठी ४५ शिक्षकांनी भरली होती खोटी माहितीशिक्षक संघटनांनी केली होती तक्रारशिक्षण विभागाने बजावली होती नोटीस