लोकमत न्यूज नेटवर्कवडजाई : धुळे तालुक्यातील वडजाई गावाजवळील के.टी.वेअर बंधाºयाला किनाºयाने मोठी गळती लागल्यामुळे धबधब्यासारखे स्वरुप आले आहे. ते पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. यामुळे हे पर्यटन स्थळच झाले आहे.पिकनिक स्पॉटपरिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे परिसरातील धरण, लहान-मोठे बंधारे ओसंडून वाहत आहेत. त्यात वडजाई गावाजवळ असणारा केटी वेअर बंधारा तुडुंब भरुन वाहत आहे. त्यामुळे बंधाºयाच्या एका कोपºयाला मोठी गळती लागल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाहुन जात आहे. हा बंधारा उंच असल्यामुळे हे पडणारे पाणी धबधब्यासारखे पडत आहे. सध्या शाळांना सुट्या आहेत. त्यामुळे हा नजारा पाहण्यासाठी येथे अनेक जण जेवणाचे डबे घेऊन महिला व मुलांसह येत आहेत. येथे यात्रा भरल्यासारखी गर्दी होत असल्याने सध्या हा पिकनिक स्पॉट बनला आहे.मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्या उडाल्याचे चित्र दिसत आहे. के.टी. वेअरमध्ये मोठा जलसाठा असल्यामुळे या ठिकाणी पोहणारेही मोठ्या प्रमाणात येत आहेत. परंतू बंधाºयात खुप पाणी आहे. काही तरुण या बंधाºयाच्या पाण्यात उड्या मारुन पोहतात. मात्र, बंधारा जीर्ण झाल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लळींग परिसरातील दगडी नाल्यामध्ये दोघे मित्र बुडाल्याची घटना ताजी असताना वडजाई येथे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.महिला, लहान मुलांची येथे मोठी गर्दी होत असल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांनी या गर्दीला त्वरित आवर घालावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.सर्व कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असतांना एवढा मोठा जमाव जमणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण दिल्यासारखेच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.याबाबत मोहाडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक संगिता राऊत यांना गावकऱ्यांनी फोन करुन माहिती दिली. त्यांनी दुपारी या स्थळाला भेट दिली. तसेच या परिसरात कोणीही येण्यास बंदी केली आहे, असे सांगून गेल्या. मात्र, चार वाजेनंतर पुन्हा मोठी गर्दी उसळली. यामुळे मोहाडी पोलिसांनी गर्दी होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.दरम्यान, या गर्दीमुळे येथे वाद वाढण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनाची ये- जा सुरु असल्यामुळे वादही होत आहेत. त्यासाठी पोलिसांनी दिवसभर बंदोबस्त लावावा, अशी मागणी वडजाई ग्रामस्थांनी केली आहे.
किनाऱ्याला गळती लागल्याने के.टी.वेअरला धबधब्याचे स्वरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:03 PM