साक्री बाजार समितीत हमाल मापाडी कायदा लागू करा, हायकोर्ट निकालानंतर जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 06:05 PM2023-07-12T18:05:59+5:302023-07-12T18:06:10+5:30
व्यापाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता व व्यापारी यांनी या कायद्याची अंमलबजावणीला विरोध केला होता.
राजेंद्र शर्मा
औरंगाबाद खंडपिठाचा निकाल, पिंपळनेरला हमाल मापाडी बांधवांनी केला जल्लोष पिंपळनेर - साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती व अंतर्गत उपबाजार समिती पिंपळनेर व इतर समितीत हमाल मापाडी कायदा लागू करण्याचा निकाल बुधवारी औरंगाबाद खंडपिठाने दिला. निकाल जाहीर झाल्यानंतर हमाल मापडी बांधवांनी गुलाल उधळून जल्लोष केला.
पिंपळनेर येथील कांदा भुसार व्यापारी यांच्या माथाडी कायदा लावण्यासंदर्भात उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औंरगाबाद येथे दाखल केलेली याचिकेचा निकाल बुधवारी हमाल मापाडी यांच्या बाजूने लागल्याने गुलालाची उधळण करीत जल्लोष केला व कोर्टाने संपूर्ण साक्री तालुक्यासह खाजगी मार्केट येथे माथाडी कायदा अंमलबजावणी सक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोर्टाचा आवमान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे माथाडी बोर्ड व बाजार समितीला आदेश देण्यात आल्याची माहिती हमाल मापाडी संघटनेचे पदाधिकारी संचालक दिनकर बागुल यांनी लोकमतला माहिती दिली. हायकोर्टाच्या निर्देशानुसार साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीत महाराष्ट्र माथाडी हमाल कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात नेमलेल्या भरारी पथकाने व्यापाऱ्यांवर केलेल्या कारवाई विरोधात बेमुदत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता व व्यापारी यांनी या कायद्याची अंमल बाजावणीला विरोध केला होता.
साक्री कृषि उत्पन्न बाजार समितीत १ नोव्हेंबर २०१७ पासुन माथाडी कायदा लागू केला आहे. या कायद्याची अंमल बजावणी करण्यासंदर्भात पिंपळनेर येथील व्यापाऱ्यांना समितीने १२ एप्रिल आणि ६ मे२०२३ रोजी साक्री बाजार समितीने नोटीस बजाविली होती. तरीही त्याची अंमलबजावणी झाली नाही. यासंदर्भात १५ जून रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी साक्री बाजार समितीचे चेअरमन सचिव अध्यक्ष हमाल कामगार संघटना, अध्यक्ष माथाडी मापाडी संघटना व अध्यक्ष व्यापारी संघटना यांची बैठक घेऊन कायदा अंमलबजावणी संदर्भात चर्चा केली. परंतू त्यानंतर ही व्यापाऱ्यांनी अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले. नंतर व्यापाऱ्यांनी मार्केट मध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी बाजार समितीकडे केली. त्यानंतर समितीने सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत मार्केट बंद ठेवला. त्यामुळे मार्केट आजही बंदच आहे.