लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७ जूनपासून विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरु आहे़ वेगवेगळ्या विषयांसाठी प्रत्येक वेळी सर्व डॉक्युमेंट पुन्हा पुन्हा स्कॅन करुन तब्बल अडीच लाख विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले़ मात्र, त्यात त्रुट्या आढळल्याने ते अर्ज पुन्हा भरण्यात यावे, अशी सूचना विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे़ ही बाब विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणारी असल्याने अडीच लाख विद्यार्थ्यांच्या अर्जामधील त्रुटी काढून कायम करण्यात यावे, अशी मागणी युवा सेनेच्यावतीने करण्यात आली़ उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांना निवेदन देण्यात आले़ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७ जून पासून रजिस्ट्रेशन सुरु असून २१ जून ही अंतिम मुदत होती़ या मुदतीत अडीच लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली़ एखाद्या विद्यार्थ्याचा अर्ज बाद झाल्यास व त्याने विचारणा केल्यास नियामक प्राधीकरण सीईटी सेलकडे संपर्क साधा, असे सांगतात़ परंतु या सेलचे अधिकारी ‘नॉट रिचेबल’ असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे़ त्यामुळे या अडीच लाख विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसू नये याकरीता २१ जूनपर्यंत भरलेले ४ लाख पैकी अडीच लाख अर्जांतील त्रुटी काढून कायम करण्यात यावे़ अशी मागणी युवा सेनेचे अॅड़ पंकज गोरे, संदिप मुळीक, हरिष माळी, जीत पाटील, अमित खंडेलवाल, प्रेम सोनार, भूषण चौधरी, मयूर सोंजे, निलेश चौधरी, धनंजय दीक्षित यांनी केली़पोर्टलवर एकाच वेळेस ५२ कोर्सेसची नोंदणी नसावी़ प्रवेश प्रक्रिया जुन्या संगणक प्रणालीप्रमाणे वापराव्या़ पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची स्कॅनिंग करु नये, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे़
अडीच लाख विद्यार्थ्यांचे अर्ज कायम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 7:47 PM