ना-हरकत प्रमाणपत्र अन् जागेचा प्रश्न कायम : हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़एस़एस़ गुप्ता यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेटधुळे, दि. 8- जिल्ह्यात हिरे वैद्यकीय महाविद्यालयाजवळ जैविक घनकचरा प्रकल्प तयार करण्यासाठी प्रयत्न आहेत़ जिल्हा नियोजन मंडळाकडून त्यासाठी निधीची तरतूदही झाली आह़े मात्र ना-हरकत प्रमाणपत्र आणि जागेचा अडसर कायम असल्याने हा प्रकल्प रखडलेलाच आह़े तो मार्गी लागावा, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ एस़ एस़ गुप्ता यांनी ‘लोकमत’ कार्यालयात संवाद साधताना दिली. जैविक घनकचरा प्रकल्प तयार व्हावाजिल्ह्यात दवाखाने असल्यामुळे वैद्यकीय कचरा मोठय़ा प्रमाणावर साचत आह़े त्याचा विनियोग करण्यासाठी जैविक घनकचरा प्रकल्प तयार झाला पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न आह़े, असे डॉ़ गुप्ता यांनी सांगितले. जिल्हा नियोजन मंडळाकडून त्यासाठी 75 लाखांर्पयत विशेष तरतूददेखील करण्यात आलेली आह़े पण, त्यासाठी आवश्यक असणारे ना-हरकत प्रमाणपत्र आणि जागेचा तिढा सुटलेला नाही़ तो सुटल्यानंतर हा प्रकल्प निश्चित उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एमसीआयच्या नॉम्सप्रमाणे कामकाजएमसीआयच्या नॉम्सप्रमाणे लक्षात घेता महाविद्यालय आणि रुग्णालय हे एकाच ठिकाणी असायला हव़े मात्र, ते नसल्यामुळे काही वेळेस अडचणी निर्माण होत होत्या़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालय स्थलांतरित करावे, यासाठी गेल्या तीन वर्षापासून शासनाकडे माझा सातत्याने पाठपुरावा सुरू होता़, पण त्याला यश येत नव्हत़े अखेर तीन वर्षानंतर शासनाने सकारात्मकता दर्शवली आणि क्षणार्धात शहरातील जिल्हा रुग्णालय, हे हिरे वैद्यकीय महाविद्यालयाकडे नेण्यात आलेले आह़े आता एकाच ठिकाणी रुग्णालय आणि महाविद्यालय सुरू असल्यामुळे एमसीआयचे नॉम्स पूर्ण करण्यात आलेले आहेत, असे डॉ़ गुप्ता म्हणाले. डॉक्टरांवर हल्ले करणे चुकीचे मुळात डॉक्टरांवर हल्ले होणे, हे चुकीचेच आह़े डॉक्टर हा देव नाही, हे समजून घ्यायला हव़े रुग्णांसोबत इतके नातेवाईक आणि परिचित असतात, की रुग्णाच्या आजाराबाबत प्रत्येकाचे वेगवेगळे म्हणणे असत़े अतिशिक्षणामुळे तर काही जण डॉक्टरांनाच सल्ला देतात आणि उपचार कसा आणि कोणता करणे संयुक्तिक होईल, हे सांगतात़ काही वेळेस तर दबाव इतका असतो की, डॉक्टरांना कामच करता येत नाही़ त्याचा परिणाम इच्छा असूनही रुग्णाला वैद्यकीय सेवा पुरवली जात नाही़ त्यामुळे डॉक्टरांना त्यांच्या पद्धतीने काम करू दिल्यास त्याचा फायदा हा रुग्णांना मिळणा:या उपचारावर चांगल्याप्रकारे होऊ शकतो, असा विश्वास आह़े आमच्याकडे अमृत नाही आणि विषही नाही, हे प्रत्येकाने समजून घेण्याची आवश्यकता आह, असे मत डॉ़ गुप्ता यांनी व्यक्त केले. सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीने दिलासा!हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांवर हल्ला झाल्यानंतर वैद्यकीय सेवेचे काम करताना अडचणी येत होत्या़ आता सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आह़े रुग्णासोबत एकच जणाला पाठविण्यात येत असल्यामुळे काहीसा दिलासा असल्याची माहिती डॉ़ गुप्ता यांनी दिली.
धुळ्य़ात जैविक घनकचरा प्रकल्पास ‘मान्यता’, मात्र जागेअभावी रखडला!
By admin | Published: April 08, 2017 1:13 PM