धुळे : शहरातील रस्ते जीवघेणे ठरत आहेत़ या खड्ड्यांमुळे नागरीकांच्या जिवीताला धोका होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रसिध्द केल्यानंतर रस्त्यांची डागडूगी करण्याचा निर्णय शुक्रवारी बैठकीत आला़ त्यांनतर लगेचच शनिवारी दुरूस्तीच्या कामाचा शुभांरभ झाला़ त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे़मनपाच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शुक्रवारी सकाळी १० वाजता स्थायी समितीची विशेष सभा घेण्यात आली़ यावेळी स्थायी समितीचे सभापती युवराज पाटील, उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य उपस्थित होते़ निवडणूकीची आचारसंहितेपुर्वी महापालिकेच्या आठवड्याभरात तीन स्थायी समिती तर एक महासभा घेण्यात आली़ शुक्रवारी झालेल्या स्थायीच्या सभेत काही मिनिटात चार विषयांना मंजूरी देण्यात आली होती़खड्ड्यावरून आरोपखड्डयामुळे अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ त्यासाठी खड्डे मुक्त शहराची घोषण होण्याची गरज आहे़ सत्ताधाऱ्याकडून विकास काम करतांना दुजाभाव केला जातो़ असा आरोप विराधकांनी केला़ यावेळी नागसेन बोरसे यांनी विरोधक भाजपाला बदनामी करण्यासाठी खड्ड्याचा विषय पुढे आणत असल्याचा आरोप केला़ महाराणा प्रताप चौकातील उद्यान विकसीत करण्याच्या कामाची निविदा स्थायी समितीत मंजूरीसाठी ठेवण्यात आला होतो़ सकाळी १० वाजता बैठकीत मंजूरी देण्यात आली़
शुक्रवारी मंजुरी, शनिवारी रस्ते दुरूस्तीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:24 PM