लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर निर्माण होणारी चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने जुलै २०१९ अखेर पुरेल एवढ्या ६ लाख ५९ हजार ५४४ मेट्रीक टन चाºयाचे नियोजन केलेले आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी चारा टंचाई उदभवल्यास पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच तयारी सुरू केलेली आहे. जिल्ह्यात यावर्षी सुरवातीपासूनच असमाधानकारक पावसाने हजेरी लावली. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने, जिल्ह्याला दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागतोय. कमी पावसाअभावी पाणी टंचाई सोबतच चारा टंचाई देखील भासण्याची दाट शक्यता आहे.खरीप हंगामात झालेल्या पेरणीमुळे काही प्रमाणात चारा उपलब्ध आहे. मात्र अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने, रब्बीच्या पेरणीवर त्याचा परिणाम झालेला आहे. मात्र जिल्ह्यात जेवढ्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, त्यातून काही प्रमाणात चारा उपलब्ध होऊ शकतो. येथील पशुसंवर्धन विभागामार्फत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्या ३ लाख २७ हजार ८१४ मेट्रीक टन चारा असून, तो मार्च २०१९ अखेरपर्यंत पुरू शकणार आहे.मार्चनंतर निर्माण होणारी संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता संबंधित विभागाने आतापासूनच त्याची तयारी सुरू केलेली आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्हयातील शेतकºयांना दहा गुंठ्यासाठी मका ५ किलो तर ज्वारी ४ किलो याप्रमाणे मका ७ हजार ५४८ तर ज्वारीचे बियाणे २१ हजार ५७६ किलोचे वाटप केले आहे. तसेच मक्याचे १८ हजार ८७५ व ज्वारीचे १८ हजार ३४७ किलो वाढीव बियाण्यांचीही मागणी करण्यात आलेली आहे. पाच किलो मक्याची पेरणी केल्यास त्यातून साडेपाच हजार किलो तर ४ किलो ज्वारीची लागवड केल्यास त्यातून ४४०० किलो चाºयाची उपलब्ध ता होत असते. या नियोजनामुळे जवळपास ३ लाख ३१ हजार ७३० मेट्रीक टन चारा उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चारा टंचाईच्या पार्श्वभूमिवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फतही न्युट्रीफिड बियाण्यांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यामुळेही चाºयाची उपलब्धता होणार आहे.त्याचबरोबर गाळप क्षेत्रातही मका, ज्वारीची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी मक्याची १० हजार किलो तर ज्वारीची ५ हजार किलो बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे.दरम्यान जिल्ह्यातील शेतकºयांनी मका, ज्वारी या बियाण्यांची जास्तीत जास्त लागवड करून चारा उत्पादन करावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आलेली आहे.
साडेसहा लाख मेट्रीक टन चा-याचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:13 PM