शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

चार महिन्यात जगविली तब्बल १०० झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 4:11 PM

शिंदखेडा : शहरातील तरुणांनी घेतली पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी

शिंदखेडा : शहरातील विरदेल रोडवरील तरुण स्वत:च्या आरोग्यासाठी सकाळी विरदेलरोडवर पायी फिरण्यासाठी येतांना सोबत पाण्याच्या बाटल्या घेऊन जातात व त्यांनी लावलेल्या झाडांना ते पाणी घालतात. या तरुणांनी रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेली सुमारे दीड कि.मी. अंतरावरील ९० ते १०० झाडे जगविली आहेत. हा त्यांचा उपक्रम गेल्या ४ महिन्यांपासून नित्यनेमाने सुरू आहे.या तरुणांनी नुसती झाडेच लावली नाही तर त्याची निगाही ते राखत आहेत. स्वत:चे आरोग्य सांभाळत पर्यावरण संवर्धनाचे कामही हे तरुण करत असून त्यांच्या या उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे. तसेच हा उपक्रम इतरांनाही प्रेरणादायी ठरणार आहे.शहराला जोडणाऱ्या ५ ते ६ रस्त्यावर सकाळी व सायंकाळी सुमारे हजारावर नागरिक पायी फिरण्यासाठी जातात. प्रत्येकाने एक जरी झाड जगवले तर एका वर्षात शहराच्या आजूबाजूला एक हजार झाडे दिसतील. त्यासाठी या तरुणांचा आदर्श घेण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रीया ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.शिंदखेडा ते विरदेल हा रस्ता चौपदरी होत असल्याने या रस्त्यावरील सुमारे शंभर ते दीडशे वर्षे जुनी मोठमोठी झाडे तोडण्यात आली. त्यामुळे हा रस्ता झाडे नसल्याने भकास दिसत आहे.यासाठी येथील योगेश बोरसे यांनी त्यांचे मित्र जीवन देशमुख, रोहित कौठळकर, बबलू मराठे, भूषण फौजी आदींच्या मदतीने दररोज सकाळी या रस्त्यावर आरोग्यासाठी पायी फिरण्यास जात असताना या रस्त्यावर झाडे लावण्याचे ठरवले. आणि ते जेवढे अंतर पायी चालत जातात, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस दीड कि.मी. अंतरात त्यांनी ७५ ते १०० झाडे लावली. नुसते झाडे लावून न थांबता हे तरुण गेल्या ४ महिन्यापासून नित्यनेमाने फिरण्यासाठी जातांना सोबत घरून पाण्याने भरलेला ड्रम घेऊन जातात. आणि त्या झाडांना पाणीही घालतात.यामुळे या झाडांची चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. यासाठी सुरुवातीस या तरुणांनी शहरातील प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन प्लास्टिकच्या बाटल्या जमा केल्या. आणि प्रत्येक झाडाला एक बाटली लावून त्यातून पाणी देत होते. मात्र, त्यांच्या या बाटल्या दररोज भंगार विकणारे उचलून नेत. मग त्यांनी घरूनच पाणी आणून झाडांना देण्यास सुरुवात केल्याने आता दीड कि.मी. अंतरावरील झाडांची चांगली ४ ते ५ फुटापर्यंत वाढ झाली आहे. अन्य पायी फिरणाऱ्यांनीही त्यांचा आदर्श घेतल्यास शहरात येणारा प्रत्येक रस्ता हा भविष्यात वृक्षराजींनी फुललेला दिसेल, यात शंकाच नाही. फक्त गरज आहे ती प्रेरणेची.

टॅग्स :Dhuleधुळे