लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : समाज माध्यमावर साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या ‘त्या’शिक्षकाला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी बचाव संघटनेतर्फे पोलीस निरीक्षक भूषण हंडोरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, पांझरा-कान बचाव समिती या व्हासटसअप गृपवर अकलाडे नामक व्यक्तीने आमदारांबद्दल असभ्य भाषेत पोस्ट करून महिला जातीचा अपमान केला आहे. महिला आमदाराची बदनामी करणाºया त्या शिक्षकाला अटक करण्याची मागणी केली आहे. त्या शिक्षकाला अटक न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक हंडोरे यांना महिलांचा अपमान करणाºया अशा शिक्षकाला त्वरित अटक करीत कठोर कारवाई करण्याची मागणी केली.निवेदन देतांना पंचक्रोशीतील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी बचाव अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बहिरम, तालुका अध्यक्ष रमेश सूर्यवंशी, तालुकाप्रमुख गणेश गावित, कार्याध्यक्ष तुकाराम बळीराम, पंकज सूर्यवंशी, मांगीलाल गांगुर्डे, केंद्रीय सचिव मनीराम अहिरे, काँग्रेस उपाध्यक्ष कमलाकर साबळे, ललित चौरे, अनिल राऊत, प्रवीण चौरे, जिल्हा परिषद सदस्य धनलाल पवार, जिल्हा परिषद सदस्य विश्वास बागुल, काळू माळचे, विश्वास सोनवणे, भीमा गांगुर्डे ओमकार राऊत, मन्साराम भोये, मीना ठाकरे, अनिता गवळी, महारु चौरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
‘त्या’शिक्षकाला अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 1:49 PM