धुळे : शहरातील अमळनेर फाटयावर विकास रणजीत पाटील याला बुधवारी माउझर पिस्तौल व गावठी कट्टयासह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले.स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुरुवारी दुपारी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचून विकस रणजीत पाटील (राजपूत) याला पकडले. त्याच्याकडून ४० हजाराचे माउझर पिस्तौल आणि १० हजाराचा गावठी कट्टा पोलिसांनी हस्तगत केला.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर हनुमंत उगले, हेकॉ रफीक पठाण, पोलीस नाईक प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, राहूल सानप, उमेश पवार, मयूर पाटील, रवीकिरण राठोड, विशाल पाटील, विजय सोनवणे, तुषार पारधी, किशोर पाटील, योगेश जगताप या पथकाने केली.
गावठी कट्टा व पिस्तौल बाळगणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:31 PM