लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर उभ्या असणाºया दोघांना ट्रकने चिरडल्याची घटना धुळे तालुक्यातील आर्वी गावालगत घडली़ त्यात एक जण जागीच ठार झाला असून एक गंभीर आहे़ ही घटना ताजी असताना त्याचवेळेस जिल्हाधिकाºयांचे वाहन तेथून जात असताना वाहनावर दगडफेकीचा प्रकार घडला़ यात वाहनाचा एक काच फुटला असून सुदैवाने दुखापत कोणालाही दुखापत झाली नाही़ घटनेची माहिती मिळताच याठिकाणी पोलीस अधीक्षक आणि प्रांताधिकारी तातडीने दाखल झाले़ वातावरण शांत असलेतरी तणाव मात्र कायम होता़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे तालुक्यातील आर्वी येथे असलेल्या सर्व्हिस रोडवर ही अपघाताची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास घडली़ यात एक जण जागीच ठार झाला तर एकास गंभीर दुखापत झाली़ यामुळे आर्वी ग्रामस्थ एकवटले होते़ परिणामी महामार्गावरील दोनही बाजुंची वाहतूक ठप्प झाली होती़ त्याचवेळेस जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे नाशिक येथील बैठकीसाठी जात होते़ जिल्हाधिकाºयांचे एमएच १८ एजे ७२७१ या क्रमांकाचे वाहन बघताच वाहनावर कोणीतरी दगड भिरकाविला़ त्यात वाहनाचा काच फुटल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता़ जिल्हाधिकाºयांनी समयसुचकता पाहून वाहन थांबविले आणि घटना काय घडली आहे, ग्रामस्थांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला़ अपघातातील मयत आणि जखमींना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ गंभीर असलेल्या रुग्णावर उपचार सुरु आहे़जिल्हाधिकाºयांच्या वाहनावर दगडफेक झाल्याची माहिती मिळताच तातडीने पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला़ गावात शांतता असलीतरी तणाव मात्र कायम आहे़
धुळे जिल्हाधिकाºयांच्या वाहनावर आर्वीत दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:13 PM
मुंबई आग्रा महामार्ग : अपघातामुळे ग्रामस्थ आक्रमक
ठळक मुद्देआर्वीजवळ अपघातामुळे ग्रामस्थ रस्त्यावरनाशिककडे जाणाºया जिल्हाधिकाºयांच्या वाहनावर दगडफेकपोलीस अधीक्षकांसह प्रांताधिकारीही पोहचले आर्वीत