लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव जाणाºया वाहनाने कारला जोरदार धडक दिली़ ही घटना मंगळवारी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ यात १ तरुण ठार तर अन्य दोघे जखमी झाले आहेत़ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ धुळ्यातील पोलीस मुख्यालयात राहणारा नीलेश मन्साराम बैसाणे (३०), भूषण रमेश जाधव (२८, रा़ जुने धुळे) आणि मयूर चौधरी (२८, रा़ सावदा ता़ रावेर) हे तिघे तरुण एमएच १५ ईपी ९०९२ क्रमांकाच्या कारने धुळ्याकडून नाशिकला कारने जाण्यासाठी निघाले होते़ मंगळवारी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आर्वी गावाच्या शिवारात आर्वी औटपोस्टजवळ त्यांच्या कारला भिषण अपघात झाला़ अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली़ या अपघातात नीलेश बैसाणे हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़ तसेच अपघातग्रस्त कारमधील भूषण जाधव आणि मयूर चौधरी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत़ त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते़ तेथून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ दरम्यान, अपघातातील मयत तरुण नीलेश बैसाणे याचे वडील मन्साराम बैसाणे हे पोलीस मुख्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहेत़ या अपघाताची नोंद धुळे तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे़
आर्वीनजिक अपघात तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:31 PM
पहाटेची घटना : दोन जणांना दुखापत
ठळक मुद्देमहामार्गावरील आर्वीनजिक अपघातकारचा झाला चक्काचूर, दोघांना दुखापत