धुळे : शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला विविध सुट्या, व्यापारी वर्षानिमित्त व हमाल बांधव सप्तश्रृंगी गडावर पायी वारीला जात असल्यामुळे २८ मार्च व ३ एप्रिल असे सलग ७ दिवस खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे सोमवारी मोठ्या प्रमाणावर भुसार माल विक्रीसाठी आला होता़ गहू व हरभऱ्याला अधिक भाव मिळत असल्यामुळे शेतकरी सध्या तरी समाधानी आहेत. दरम्यान, १५०-२०० वाहने, ७०-८० बैलगाडीतून शेतीमाल विक्रीसाठी आला होता.
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दर शनिवारी व रविवारी खरेदी-विक्रीचे व्यवहार होत नाही़ आर्थिक वर्ष असल्यामुळे व्यापाºयांना खाते जुळवणीसाठी २८ ते ३१ रोजी मार्केटला सुट्टी, १ रोजी शनिवार, २ रोजी रविवार असल्यामुळे पुन्हा सुट्टी मिळाली़ तसेच गेल्या २५ वर्षापासून हमाल-मापाडी बांधव सप्तश्रृंगी गडावर पायी वारी करत असल्यामुळे बंद ठेवले आहे. सोमवार, ३ एप्रिलपासून मार्केट पूर्ववत सुरू होईल