धुळे : महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल पगार यांच्यावर सेवानिवृत्तीच्या दिवशीच लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता़ दरम्यान, त्यांच्या चौकशीसह अन्य मागण्या करणारी चार पत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मनपाला दिली आहेत़मनपाचे कार्यकारी अभियंता अनिल यशवंत पगार यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी सेवानिवृत्तीच्या दिवशी अर्थात 31 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता़ त्यानंतरही पगार हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे हजर झालेले नाही़ त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मनपाला चार पत्रे दिली असून पगार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे हजर होण्याबाबत समज द्यावी, 10 व 12 जानेवारीला पगार हे मनपात उपस्थित होते का? त्यांची सेवापुस्तिका सादर करावी व पगार यांची सक्षम प्राधिकरणाकडून चौकशी करावी, अशी पत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मनपाला दिली आहेत़ मात्र अनिल पगार हे वर्ग एकचे अधिकारी असल्याने त्यांची चौकशी करण्याचा किंवा कारवाईचा अधिकार महापालिकेला नाही़ त्यामुळे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अवर सचिवांना पत्र दिले जाणार आह़े तसेच पगार हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असल्याने एसीबीची पत्रे बांधकाम विभागाला सादर केली जातील, असे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आल़े पदभार सोपविला?़़अभियंता अनिल पगार यांच्यासंदर्भात शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करावयाचा असल्याने मनपाचे अधिकारी गुरुवारी जिल्हाधिका:यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गेले होत़े मात्र आयुक्त रजेवर गेल्यानंतर जिल्हाधिका:यांकडे पदभारच सोपविण्यात आला नसल्याचे समोर आल़े
पगार यांच्याबाबत मनपाला विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2017 1:00 AM