लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अन्न व औषध प्रशासनातील फरार बडतर्फ सहायक आयुक्त नितीन शंकरराव देवरे यांना नांदेड पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा धुळे येथे देवपुरातील एका विवाह समारंभात अटक केली़ बनावट कागदपत्रे तयार करून अन्न व औषध प्रशासनात नोकरी मिळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे़ देवरे नांदेड येथे कार्र्यरत असताना त्यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीनंतर नांदेड येथील न्यायालयाच्या आदेशाने भाग्यनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनातर्फे कागदपत्रांची पडताळणी केली असता देवरे यांची कागदपत्रे बनावट असल्याचे सिद्ध झाले़ त्यामुळे त्यांना २० आॅगस्ट २०१३ रोजी शासकीय सेवेतून मुक्त करण्यात आले होते. देवरेंनी अटक टाळण्यासाठी नांदेड सत्र न्यायालयात अर्ज केला होता़ त्यावर न्या़ एम़ बी़ म्हस्के यांनी २ एप्रिल २०१४ रोजी निकाल देताना बनावट कागदपत्र सादर करून नोकरी मिळविल्याचे सिद्ध झाल्याने शासनाने त्यांना अटक करावी, असे म्हटले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही सेवादेवरे हे सुरुवातीला हिरे मेडिकल कॉलेजमध्ये औषध निर्माता - वर्ग २ या पदावर तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत होते.त्या वेळीच देवरेंनी बनवाबनवी करून अन्न व औषध प्रशासनात नियुक्ती मिळवली, असा संशय आहे.
फरार बडतर्फ सहायक आयुक्ताला अटक
By admin | Published: July 04, 2017 5:01 AM