शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

अपर तहसीलदारांवर वाळू माफियांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 10:21 PM

पांझरा नदी पात्र : पोलिसांच्या सतर्कमुळे दुर्घटना टळली

धुळे : शहरातील पांझरा नदीपात्रातून वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या अपर तहसीलदार व पथकावर दगड, काठ्यांनी हल्ला चढविण्यात आला़ पण, पोलिसांच्या सतर्कमुळे माफियांचा मनसुबा हाणून पाडण्यात आला़ जमलेल्या त्या जमावाला पांगविण्यात आले़ तहसीलदारांनी १० ब्रास वाळू आणि अन्य साहित्य जप्त केले आहे़ दुपारपासून सुरु झालेली ही कारवाई सायंकाळपर्यंत सुरु होती़ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल होता़गेल्या दोन ते महिन्यांपुर्वी दमदार पाऊस झाला होता़ पश्चिम पट्यात पावसाचा जोर असल्यामुळे सर्वच धरणे तुडूंब भरले होते़ ४० ते ४५ वर्षानंतर पहिल्यांदाच पांझरेला महापूर आला होता़ त्यात वाळू देखील मोठ्या प्रमाणावर वाहून आली होती़ साहजिकच वाळू माफियांचे याकडे लक्ष गेले आणि पांझरेतून वाळूची तस्करी सुरु झाली़ यापुर्वी दोन ते तीन वेळा अपर तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने वाळू माफियांवर कारवाईचे अस्त्र उगारले होते़ धुळे तालुक्यातील वार-कुंडाणे शिवारात देखील वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाला होता़ही घटना तशी ताजी असतानाच पांझरा नदीपात्रातून सर्रासपणे वाळूची चोरीची होत असल्याची गोपनीय माहिती अपर तहसीलदार संजय शिंदे यांना मिळाली़ मिळालेल्या माहितीच्या आधारे अपर तहसीलदार शिंदे आणि त्यांच्या पथकाने पांझरा नदीपात्र गाठले़ तत्पुर्वी याबाबतची माहिती प्रांताधिकारी दराडे यांना देण्यात आली होती़ पांझरा नदीपात्रात कारवाईच्यावेळी कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याची खबरदारी घेत पथकाने पोलिसांनाही बोलावून घेतले होते़ पथक पांझरा नदीत गेल्यावर आपल्यावर कारवाई होईल या भीतीने वाळू चोरांकडून अपर तहसीलदार आणि पथकावर दगडांचा वर्षाव करण्यात आला़ शिवाय काठ्याही उगारण्यात आल्या़ अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ तणाव वाढत असल्याचे समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, देवपूर पोलीस निरीक्षक संजय सानप, पश्चिम देवपूर पोलीस निरीक्षक कुबेर चवरे, शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्यासह अन्य अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याने हल्लेखोर वाळू माफियांनी पळ काढला़ त्यांना पकडण्यासाठी पोलीस देखील त्यांच्यामागे धावले होते़ पण, एकही त्यांच्या हाती सापडला नाही़ अपर तहसीलदारांनी वाळू उपसा करणारी साधनसामुग्रीसह १० ब्रास वाळू जप्त केली आहे़ सायंकाळ होत असल्यामुळे काही वाळू जागेवरच पसरुन देण्यात आली होती़पांझरा नदीपात्रातून कोणीही वाळूची चोरी करु नये यासाठी पोलिसांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत़ वाळूची चोरी करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे देखील सांगण्यात आले आहे़ कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नसून केवळ १० ब्रास वाळू व काही साधनसामुग्री जप्त केली आहे़- संजय शिंदे, अपर तहसीलदार, धुळे

टॅग्स :Dhuleधुळे